इराण कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, खामेनेई म्हणाले- इस्रायलवर आता घातक वार; ट्रम्प, जिनपिंग, पुतिन- आगीत तेल कोण ओततोय

Last Updated:

Israel Iran War Update: इस्रायलविरुद्ध उसळलेल्या युद्धसदृश स्थितीत आता इराणने आपली भूमिका स्पष्ट करत शांततेच्या वाटाघाटींनाही नकार दिला आहे. सर्वोच्च नेता अयातुल्ला खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली तेहरानने सांगितले – जेव्हा बॉम्ब उडत आहेत, तेव्हा संवाद शक्य नाही.

News18
News18
तेहरान: मध्यपूर्व आशियामध्ये वाढत चाललेला तणाव आणि इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध अधिक भडक होत चालल्याचे स्पष्ट होत आहे. या युद्धात आता इराण पूर्णपणे आर या पारच्या मूडमध्ये गेला आहे. मग तो अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग असोत किंवा रशियाचे व्लादिमीर पुतिन –इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई सध्या कोणाचाही सल्ला ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.
तेहरानने स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत इराणवर हल्ले सुरू राहतील आणि अमेरिका या आक्रमकतेचा भाग असेल, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची राजयकीय चर्चा शक्य नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी म्हटले, ज्या कूटनीतीवर बॉम्बांचे सावट आहे, त्यावर विश्वास ठेवता येत नाही.
advertisement
बोलण्याने काही बदल होईल का?
हा खवळलेला संदेश अशा वेळी आला आहे जेव्हा जगभरातील मोठे नेते शांततेचे आवाहन करत आहेत. बीजिंगमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मिडल ईस्टमधील सद्य परिस्थितीवर ‘चार सूत्रीय प्रस्ताव’ मांडला. यामध्ये युद्धबंदी, नागरिकांचे संरक्षण, संवादाचा प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा समावेश होता. पण तेहरान स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की आता केवळ ‘बोलण्याने’ परिस्थिती सुधारणार नाही.
advertisement
इराणने आरोप केला आहे की अमेरिका केवळ प्रेक्षक नाही तर या हल्ल्यांचा ‘सहभागी’ आहे. परराष्ट्र मंत्री आराघची यांचं हे विधान थेट अमेरिका आणि तिचे सहयोगी देश यांच्यावर टोकाचं टीकास्त्र आहे. ज्यांच्यावर इराण अनेक वर्षांपासून प्रादेशिक अस्थिरता पसरवण्याचा आरोप करत आलं आहे.
advertisement
मैदानात केवळ शस्त्र नाही
इराणकडून आलेला हा कठोर पवित्रा अशा वेळी समोर आला आहे जेव्हा देशांतर्गत संताप आणि राष्ट्रवाद उच्चांकावर आहे. खामेनेई यांची मौनव्रती आता एका रणनीतीचा भाग मानली जात आहे. विश्लेषकांचे मत आहे की, इराण आता कोणत्याही परिस्थितीत इस्रायलला प्रत्युत्तर द्यायचं ठरवून बसलं आहे.
दरम्यान चीनचं म्हणणं आहे की- शांतता प्रस्थापित करणं ही आंतरराष्ट्रीय समुदायाची सामूहिक जबाबदारी आहे. पण प्रश्न असा आहे की, शांततेच्या हाकेला तिथं प्रतिसाद मिळेल का, जिथं चारही बाजूंनी केवळ स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराण कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, खामेनेई म्हणाले- इस्रायलवर आता घातक वार; ट्रम्प, जिनपिंग, पुतिन- आगीत तेल कोण ओततोय
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement