राष्ट्रपतींनी पळ काढताच इस्रायलने साधला डाव, हल्ल्यातून वाचण्यासाठी लोकांचा आक्रोश

Last Updated:

सीरियातील बंडखोरांनी आता राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला, राष्ट्रपती बशर अल-असद हे देश सोडून पळाले आणि त्यानंतर संघर्ष आणखी पेटला.

News18
News18
मुंबई : रशिया-युक्रेन संघर्षानंतर आता इस्रायल सीरिया संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रपतींनी पळ काढताच इस्रायलने डाव साधला आणि सीरियावर बॉम्ब हल्ले सुरू केले. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे पळत होते. हल्ल्यातून वाचण्यासाठी लोकांचा प्रचंड आक्रोश होता. राष्ट्रपती असद यांनी पळ काढताच त्यांना पुतीनं यांनी आश्रय दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सीरियातील बंडखोरांनी आता राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला, राष्ट्रपती बशर अल-असद हे देश सोडून पळाले आणि त्यानंतर संघर्ष आणखी पेटला. रशियन मीडियानुसार असद यांना मॉस्कोमध्ये आश्रय देण्यात आला आहे. सीरियासाठी नवीन युग असल्याचं बंडखोरांनी लगेच जाहीर केलं. दरम्यान, असद हे पळून जाताच इस्रायलने सीरियावर बॉम्बहल्ला केला.
राष्ट्रपती अल-असाद यांच्या 24 वर्षांच्या राजवटीवर मोठा हल्ला. बंडखोरांनी हवेत गोळीबार करत आनंद साजरा केला. सध्या सीरियात प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे इस्रायलने संधीसाधूपणा करत सीरियावर हल्ला केला आहे. बंडखोरांनी राष्ट्रपतींच्या घराचा आणि कार्यालयाचा ताबा मिळवल्याचीही माहिती मिळाली आहे.
advertisement
सीरियन मीडियाने रविवारी (8 डिसेंबर) दक्षिण सीरियातील दरारा आणि सुवायदा भागात अनेक इस्रायली हवाई हल्ले केले. सीरिया-इस्रायल सीमेजवळ आणि राजधानी दमास्कसजवळील मेझेह हवाई तळावरही हल्ले करण्यात आले. बशर अल-असद देश सोडून पळून गेल्याची बातमी रविवारी सकाळी येताच नेतान्याहू यांनी तातडीची बैठक बोलावली. सीरियाच्या सीमेवरील बफर झोन ताब्यात घेण्याचे आदेश आयडीएफला तातडीने दिले. यानंतर आयडीएफने सीरियाच्या हद्दीत प्रवेश केला. इस्रायल सीरियावर सतत बॉम्बहल्ला करत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
राष्ट्रपतींनी पळ काढताच इस्रायलने साधला डाव, हल्ल्यातून वाचण्यासाठी लोकांचा आक्रोश
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement