Israel Iran Conflict: इस्रायलची सर्वात मोठी घुसखोरी, सिस्टम हॅक; इराणला जागा दाखवली, हल्ल्यानं सर्व थांबलं

Last Updated:

Israel Iran Conflict: इस्रायली हॅकर्सनी ईरानच्या ‘बँक सेपाह’वर सायबर हल्ला करून बँकिंग सेवा कोलमडवल्या आहेत. या हल्ल्याचा परिणाम थेट गॅस स्टेशनवरही जाणवतोय. ज्यामुळे देशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

News18
News18
तेहरान: इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘फार्स’ने बँकांवर झालेल्या सायबर हल्ल्याची माहिती दिली आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, बँक सेपाहच्या ग्राहकांना सायबर हल्ल्यामुळे बँकिंग सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हा हल्ला इस्रायलशी संबंधित एका हॅकर ग्रुपने बँकेच्या सिस्टीममध्ये घुसखोरी केल्याचा दावा केल्यानंतर झाल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. फार्सच्या अहवालानुसार, बँक सेपाहमधील ही समस्या इंधन पंपांपर्यंतही पोहोचू शकते, जिथे व्यवहारासाठी या बँकेवर अवलंबून असतात. मात्र ही समस्या काही तासांत सोडवली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
सर्व काही सुरळीत
इराणच्या केंद्रीय बँकेच्या प्रवक्त्यांनी सरकारी वृत्तसंस्था IRNA ला सांगितलं की, सर्व बँकिंग सेवा सुरळीतपणे चालू आहेत आणि ग्राहकांना सेवा दिली जात आहे.
भारताला सापडला जगातील सगळ्यात मोठा तेलसाठा; एका झटक्यात इंडिया थेट टॉपला, चीन...
हा सायबर हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव शिगेला पोहोचला आहे आणि अनेक लष्करी व राजनैतिक घडामोडी सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांत बँक सेपाहवर अनेक सायबर हल्ले झाले असून त्यामध्ये संवेदनशील ग्राहक डेटाही लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे इराणच्या आर्थिक सुरक्षेतील कमकुवतपणा उघड झाला आहे.
advertisement
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अशा प्रकारचे सायबर हल्ले केवळ आर्थिक नुकसानच घडवत नाहीत तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही गंभीर धोका बनतात. इराण सरकारने भविष्यात अशा हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran Conflict: इस्रायलची सर्वात मोठी घुसखोरी, सिस्टम हॅक; इराणला जागा दाखवली, हल्ल्यानं सर्व थांबलं
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement