advertisement

Isarel Strike On Iran Oil Depot: आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, तेहरान पेटलं! इस्रायलचे इराणच्या तेलसाठ्यावर हल्ले, पाहा व्हिडीओ

Last Updated:

Israel Strik On Iran Oil Refinery: पश्चिम आशियातील तणावाने आता रौद्र रूप धारण केले आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून संयुक्तपणे इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरुच आहेत.

आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, तेहरान पेटलं! इस्रायलचे इराणच्या तेलसाठ्यावर हल्ले, जगभरात चिंता
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, तेहरान पेटलं! इस्रायलचे इराणच्या तेलसाठ्यावर हल्ले, जगभरात चिंता
तेहरान: पश्चिम आशियातील तणावाने आता रौद्र रूप धारण केले आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून संयुक्तपणे इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरुच आहेत. इस्रायलकडून पहिल्यांदाच राजधानी तेहरानमधील तेल डेपो आणि रिफायनिंग सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. या भीषण हल्ल्यांमुळे संपूर्ण तेहरान शहरात आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट दिसून आले. या तेल डेपोतून चीन व इतर देशांनाही पुरवठा केला जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या हल्ल्याचे जागतिक पातळीवर आणखी पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

इराणची लष्करी ताकद खिळखिळी करणार, इस्रायलचा इशारा...

इस्रायली संरक्षण दलाने (IDF) शनिवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे तेहरानमधील इराणच्या इंधन डेपोंवर हे हल्ले करण्यात आले. शाहरान तेल डेपोमधून आगीच्या ज्वाळा निघतानाची अनेक दृश्ये आता समोर आली आहेत.
आयडीएफने आरोप केला आहे की, "इराणची दहशतवादी राजवट या इंधन साठ्यांचा वापर त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधा चालवण्यासाठी करत आहे. येथूनच इराणमधील विविध लष्करी संस्थांना इंधनाचा पुरवठा केला जातो. हा हल्ला इराणच्या लष्करी शक्तीला कमकुवत करण्याच्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल असल्याचा दावा इराणने केला आहे.
advertisement
advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षात जीव गमावलेल्या अमेरिकन सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचवेळी त्यांनी इराणला कडक शब्दांत तंबी दिली असून, इराणने आपल्या कारवाया न थांबवल्यास हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवली जाईल, अशी धमकी दिली आहे.

इराणकडून प्रत्युत्तराचा  इशारा...

दुसरीकडे, इराणचे वरिष्ठ अधिकारी अली लारीजानी यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे. "या युद्धाची मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागेल. वॉशिंग्टन आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे," असा दावा लारीजानी यांनी केला आहे.
advertisement
दरम्यान, इराणच्या अधिकृत माध्यमांनी सुरुवातीला दक्षिण तेहरानमधील मुख्य रिफायनरी कॉम्प्लेक्सजवळील डेपोवर हल्ला झाल्याचे म्हटले होते, परंतु 'ILNA' वृत्तसंस्थेने नंतर स्पष्ट केले की त्या विशिष्ट भागाचे नुकसान झालेले नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Isarel Strike On Iran Oil Depot: आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, तेहरान पेटलं! इस्रायलचे इराणच्या तेलसाठ्यावर हल्ले, पाहा व्हिडीओ
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement