कॅनडात जस्टीन ट्रुडो युगाचा अंत, लिबरल पार्टीकडून नवीन पंतप्रधानांची निवड, कोण सांभाळणार धुरा?

Last Updated:

Canada New Prime Minister: कॅनडामधील सत्ताधारी पक्ष लिबरल पक्षाने रविवारी जस्टिन ट्रुडो यांच्या जागी नवीन पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला आहे.

News18
News18
दिल्ली: कॅनडामधील सत्ताधारी पक्ष लिबरल पक्षाने रविवारी जस्टिन ट्रुडो यांच्या जागी नवीन पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला आहे. आता माजी केंद्रीय बँकेचे गव्हर्नर मार्क कार्नी कॅनडाचे नवीन पंतप्रधान असतील. अमेरिकेत सत्तांतर घडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्यांमुळे कॅनडा आणि अमेरिकेत संबंध बिघडल्याचं दिसून येत आहे. असं असताना कॅनडामध्ये सत्तांतर घडून ट्रुडो यांच्या जागी मार्क कार्नी यांची पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे. कार्नी यांना 86 टक्के सदस्यांची मतं मिळाली आहेत.
खरं तर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणं, निश्चित समजलं जात आहे. हे डॅमेज कन्ट्रोल करण्यासाठी लिबरल पार्टीने कार्नी यांच्यावर डाव खेळल्याचं बोललं जातंय. कार्नी हे बँक ऑफ कॅनडाचे प्रमुख होते आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध आर्थिक संकटांचा सामना केला आहे. आर्थिक संकटांशी कसं लढायचं? याची त्यांना चांगलीच माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर कार्नी यांची निवड झाल्याचं सांगितलं जातं.
advertisement
मार्क कार्नी हे 2013 मध्ये बँक ऑफ इंग्लंडचे देखील प्रमुख होते. 1694 मध्ये या बँकेची स्थापना झाल्यापासून 2013 पर्यंत या बँकेचं नेतृत्व कोणत्याही गैर ब्रिटन नागरिकाने केलं नव्हतं. मार्क कार्नी पहिले नागरिक होते, जे कॅनडाचे असून ते बँक ऑफ इंग्लंडचे प्रमुख राहिले. 2008 च्या आर्थिक संकटातून कॅनडा इतर अनेक देशांच्या तुलनेत अतिशय वेगाने सावरला होता, याचं काही प्रमाणात क्रेडीट मार्क कार्नी यांना जातं.
advertisement

शेवटच्या भाषणात जस्टीन ट्रुडो काय म्हणाले

जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं शेवटचं भाषण केलं. आपल्या निरोपाच्या भाषणात, ट्रुडो यांनी लोकांना देशाच्या भविष्याशी जोडले राहण्याचे आवाहन केले. लिबरल पक्षाच्या सदस्यांच्या गर्दीशी बोलताना ट्रुडो यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले, "मला चुकीचे समजू नका, गेल्या 10 वर्षात आपण जे साध्य केलं आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. पण आजची रात्र एक पक्ष म्हणून, एक देश म्हणून आपल्या भविष्याची रात्र आहे."
view comments
मराठी बातम्या/विदेश/
कॅनडात जस्टीन ट्रुडो युगाचा अंत, लिबरल पार्टीकडून नवीन पंतप्रधानांची निवड, कोण सांभाळणार धुरा?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement