Hafiz Saeed News: पाकिस्तानमध्ये खळबळ, भारताच्या शत्रूचा गेम ओव्हर? समोर आली मोठी अपडेट...

Last Updated:

Hafiz Saeed News: लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटालची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी एकाला कंठस्नान घालण्यात आले आहे. ही व्यक्ती हाफिज सईद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

News18
News18
नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये बसून भारतात दहशवादी कारवाया करणाऱ्या लष्कर-ए-तोएबाला मोठा झटका बसला आहे. मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड, लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटालची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी एकाला कंठस्नान घालण्यात आले आहे. ही व्यक्ती हाफिज सईद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
दहशतवादी हाफिज सईदचाही खेळ संपला असल्याची पाकिस्तानमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि पाकिस्तानी हँडलवर हाफिज सईदवर हल्ला झाल्याचे दावे केले जात आहेत. हाफिज सईद 'एक्स'वर ट्रेंडिंगमध्ये आहे. जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम भागात मारला गेला आहे, असा दावा अनेक अकाउंटवरून करण्यात आला. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही.
advertisement
हाफिज सईदच्या हत्येबद्दलच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या पोस्टमध्ये असे दावे केले जात आहेत की जेव्हा हाफिज सईद पंजाबमधील झेलम येथे जात होता तेव्हा त्याच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जवळचा दहशतवादी अबू कटाल सिंधी जागीच ठार झाला. यामध्ये चालकाचाही मृत्यू झाला. तर अनेक पाकिस्तानी ट्विटर हँडल दावा करतात की हाफिज सईद देखील या कारमध्ये होता. तो गंभीर जखमी झाला आणि त्याला रावळपिंडी येथे नेण्यात आले. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.
advertisement

अबू कटालचा खात्मा...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाफिजचा निकटवर्तीय अबू कटाल याचा खात्मा करण्यात आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील झेलममध्ये शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी अदांधुंद गोळीबार केला. यामध्ये कटाल ठार झाला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून तो दहशतवादी कारवाया करत असे. कटाल ठार झाल्याने दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये मृत्यूचा दावा

advertisement
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती हाफिज सईदला मारण्यात आल्याचा दावा करत आहे. झेलम परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रावळपिंडी रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.  दुसऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की फैजल नदीम उर्फ ​​अबू कटाल सिंधीची हत्या झाल्याची पुष्टी झाली आहे, परंतु त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, ज्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.
advertisement
advertisement

हाफिज ठार झाल्याचे दावे, पण सत्य काय?

पाकिस्तानमध्ये अनेक पोस्ट व्हायरल होत असून त्यात हाफिज सईद मारला गेल्याचा दावा केला जात आहे. तथापि, अद्याप त्याची पुष्टी करण्यात आली नाही. पाकिस्तान सरकार हाफिजबद्दचली माहिती खूप गुप्त ठेवत आहे. हाफिज सईद मारला गेल्याचा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. आता सोशल मीडिया आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या गुप्त चर्चेत किती तथ्य आहे हे पाहणे बाकी आहे.
advertisement
इम्रान खानच्या पक्ष पीटीआयच्या एका नेत्याने हाफिज सईदबद्दल एक्सवर मोठा दावा केला आहे. पीटीआय नेते समद याकूब यांनी एक्स हँडलवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, 'माझ्या माहितीनुसार, हाफिज सईद आणि त्याचा पुतण्या हल्ल्यात मारले गेले आहेत. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदच्या मते, हाफिज सईद ठीक आहे, पण त्यांचा आवाज त्यांची प्रकृती ठीक असल्याचे वाटत नसल्याचे सईदने म्हटले.

हाफिज सईद कोण आहे?

हाफिज सईद हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. हाफिज सईदचा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे. एवढेच नाही तर तो 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. हाफिज सईद हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे सांगण्यात येते. भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांनी हाफिज सईदला दहशतवादी घोषित केले आहे. अमेरिकेने हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेवर बक्षीसही जाहीर केले आहे. हाफिज सईदला टेरर फंडिंग प्रकरणात तुरुंगात पाठवण्यात आले होते.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Hafiz Saeed News: पाकिस्तानमध्ये खळबळ, भारताच्या शत्रूचा गेम ओव्हर? समोर आली मोठी अपडेट...
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement