Earthquake update: रस्ते दुभंगले, इमारती खचल्या, 2 तास ठरले काळ! 1000 लोकांनी गमावला जीव
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
म्यानमार, थायलंड आणि बँकॉकमध्ये 28 मार्च रोजी 7.2 ते 7.9 तीव्रतेचा भूकंप झाला. 1000 हून अधिक मृत्यू, हजारो जखमी, इमारती कोसळल्या. म्यानमारमध्ये आणीबाणी जाहीर.
मुंबई: रक्ताचा सडा, आक्रोश आणि विनाशाची दृश्यं पाहून मन सुन्न होत आहे. म्यानमार, थायलँड आणि बँकॉकमध्ये सर्वात मोठा भूकंप आला आहे. 7.2 ते 7.9 रिश्टर स्केलपर्यंत या भूकंपाची तीव्रता वेगवेगळ्या ठिकाणी मोजण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार होता. 28 मार्च रोजी आलेल्या या भूकंपाने संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. इमारती कोसळल्या, कुठे इमारती खचल्या. काही इमारतींवर असलेल्या पाण्याच्या टाक्या फुटल्या. अतोनात नुकसान झालं. एका इमारतीमध्ये 43 हून अधिक कामगार अडकले होते ते बेपत्ता होते.
म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी, २८ मार्च रोजी आलेल्या भूकंपाने दोन्ही देशांना हादरवून टाकलं. एकामागे एक दोन भूकंपाचे धक्के बसले. भारतातही भूकंपाचे सौम्य धक्के बसले. नोएडा, गाझियाबादमध्ये हे धक्के बसले. बचाव कार्य वेगाने सुरू आहेत, सर्वत्र इमारतीचा कोसळलेला ढिग, तुटलेले रस्ते आणि कोसळणाऱ्या इमारतींचे विदारक दृश्य दिसत आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, मृतांची संख्या 1000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर जखमींची संख्याही हजारांमध्ये आहे. जीव वाचवण्याची लढाई आणखी कठीण झाली आहे. म्यानमारमध्ये भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या 150 च्या पुढे गेली आहे. अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की मृतांची संख्या पुढील काही दिवसांत आणखी वाढू शकते.
advertisement
या भूकंपाचे धक्के शेजारील थायलंडमध्येही जाणवले. बँकॉक येथे निर्माणाधीन बहुमजली इमारत कोसळल्याने कमीतकमी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 16 जखमी झाले आहेत आणि 101 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
म्यानमारच्या लष्कराचे प्रमुख सीनियर जनरल मिन आंग हलैंग यांनी राष्ट्रीय दूरदर्शनवर सांगितले की आतापर्यंत 144 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 730 लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने (USGS) मृतांची संख्या 1000 पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसरे सर्वात मोठे शहर मंडालेच्या जवळ होता आणि त्याची तीव्रता 7.7 मोजली गेली. त्यानंतर 6.4 तीव्रतेचे अनेक आफ्टरशॉक्स (भूकंपाचे धक्के) देखील आले. या विनाशकारी भूकंपाने मंडाले, नेपिडॉ, यांगून आणि इतर अनेक शहरांमधील इमारती, पूल आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
राजधानी नेपिडॉच्या रस्त्यांवर भेगा पडल्या आणि अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. एका मशिदीच्या ढिगाऱ्याखाली दबून 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, तर ढिगाऱ्याखाली अनेक लोक अजूनही अडकलेले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंडाले येथील मंदिरे आणि बौद्ध स्थळे कोसळल्याची दृश्ये दिसत आहेत. एका स्थानिक व्यक्तीने सांगितले, "आम्ही नमाज पढत होतो, तेव्हा अचानक जमीन हलण्यास सुरुवात झाली. काही सेकंदात सर्व काही धुळीत मिसळून गेले." रुग्णालयांमध्ये जखमींची मोठी गर्दी आहे, परंतु रक्ताच्या कमतरतेमुळे उपचारात उशीर होत आहे. म्यानमारच्या लष्कराने सहा राज्यांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे.
advertisement
संयुक्त राष्ट्रांनी तातडीच्या मदतकार्यासाठी 5 मिलियन डॉलर्स जारी केले आहेत. दोन्ही देशांमधील रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या सतत वाढत आहे. म्यानमारमध्ये 732 हून अधिक लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे, तर थायलंडमध्येही शेकडो लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. रक्ताच्या मोठ्या कमतरतेमुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे कठीण होत आहे. स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्था रक्तादान करण्यासाठी पुढे येत आहेत, परंतु पुरवठा अजूनही गरजेपेक्षा कमी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 29, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Earthquake update: रस्ते दुभंगले, इमारती खचल्या, 2 तास ठरले काळ! 1000 लोकांनी गमावला जीव


