नाइट क्लबला भीषण आग, जवळपास ५० जणांचा मृत्यू, अनेक जण भाजले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nightclub Fire: नाइट क्लबला लागलेल्या भीषण आगीत जवळपास ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने कोचानी येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोचानी (उत्तर मॅसेडोनिया) - उत्तर मॅसेडोनियातील कोचानी शहरातील एका नाइट क्लबमध्ये रविवारी पहाटे भीषण आग लागून जवळपास ५० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य वृत्तसंस्था MIA ने दिली आहे. ही दुर्घटना त्या वेळी घडली जेव्हा सुमारे १,५०० लोक एका संगीत कार्यक्रमासाठी क्लबमध्ये उपस्थित होते.
ही आग रविवारी पहाटे ३ वाजता (स्थानिक वेळेनुसार) ‘पल्स क्लब’मध्ये लागली. यावेळी प्रसिद्ध हिप-हॉप जोडी ADN आपली संगीत प्रस्तुती सादर करत होती. आग इतकी भयानक होती की काही तासांपर्यंत संपूर्ण क्लब आगीच्या विळख्यात होता.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांच्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान वापरण्यात आलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टेजवरून उसळलेल्या ठिणग्यांनी छताला आग लागली आणि काही क्षणांत संपूर्ण क्लब आगीत वेढला गेला.
advertisement
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने कोचानी आणि ३० किमी दक्षिणेला असलेल्या स्तिप येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सध्या अधिकृत आकडेवारी आणि अधिक तपशील उत्तर मॅसेडोनियाच्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, घटनास्थळी बचावकार्य जोरात सुरू असून प्रशासनाने या आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 16, 2025 2:49 PM IST


