Nobel Prize In Medicine 2025: शरीर स्वतःवर का हल्ला करत नाही? या रहस्याचा उलगडा करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना नोबेल गौरव

Last Updated:

Nobel Prize 2025 in Medicine: 2025 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ, फ्रेड राम्सडेल आणि जपानच्या शिमोन साकागुची यांना देण्यात आला आहे. त्यांच्या पेरीफेरल इम्यून टॉलरन्सवरील संशोधनामुळे कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारात नवे दार उघडले आहे.

News18
News18
स्टॉकहोम: 2025 चा वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि तसेच जपानचे शिमोन साकागुची या तीन वैज्ञानिकांना मिळाला आहे. या तिघांना पेरीफेरल इम्यून टॉलरन्स (Peripheral Immune Tolerance) या विषयावरील संशोधनासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.
advertisement
पेरीफेरल इम्यून टॉलरन्स म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली (इम्यून सिस्टीम) स्वतःच्या ऊतींवर (टिश्यू) हल्ला करत नाही, या घटनेला पेरीफेरल इम्यून टॉलरन्स म्हणतात. म्हणजेच शरीराची इम्यून सिस्टीम जेव्हा स्वतःच्या पेशी आणि प्रोटीनना आपलेच ओळखते आणि त्यांच्यावर चुकीचा हल्ला करत नाही, तेव्हा ती प्रणाली योग्यरित्या कार्यरत असते.
advertisement
नोबेल पुरस्कार जाहीर होण्याची प्रक्रिया
भौतिकशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या विविध क्षेत्रांतील नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवार 6 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती 13 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. वैद्यकशास्त्रातील नोबेलचा विजेता स्वीडनच्या कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधून दुपारी सुमारे 3 वाजता जाहीर करण्यात आला. विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना (सुमारे 9 कोटी रुपये) इतकी रक्कम, सोन्याचे पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. पुरस्कार सोहळा 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे पार पडेल.
advertisement
कर्करोगाच्या उपचारात मदत करणारे संशोधन
या संशोधनामुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये तसेच अवयव प्रत्यारोपण (ऑर्गन ट्रान्सप्लांट) प्रक्रियेत मोठी मदत होणार आहे. नोबेल कमिटीने म्हटले आहे की- या संशोधनाने वैद्यकशास्त्राला नवी दिशा दिली आहे.
advertisement
आपल्या शरीरातील इम्यून सिस्टीमचे मुख्य कार्य म्हणजे विषाणू (व्हायरस), जीवाणू (बॅक्टेरिया) आणि इतर हानिकारक घटकांपासून शरीराचे रक्षण करणे. परंतु काही वेळा हीच प्रणाली चुकीने शरीरातील स्वतःच्या पेशींना परकीय समजते आणि त्यांच्यावर हल्ला करते. त्यामुळे ऑटोइम्यून रोग जसे की टाईप-1 डायबिटीज आणि रुमेटॉइड आर्थरायटिस निर्माण होतात.
advertisement
पेरीफेरल इम्यून टॉलरन्स प्रणाली अशा वेळी शरीरातील "सेल्फ अँटीजन" ओळखून त्या विरुद्ध होणारी चुकीची प्रतिक्रिया थांबवते. ती प्रणाली ओळखते की कोणते सेल आणि प्रोटीन शरीराचे स्वतःचे आहेत. जर कुठली टी-सेल शरीरातील पेशींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते, तर पेरीफेरल इम्यून टॉलरन्स त्या पेशींना निष्क्रिय करते किंवा नष्ट करते.
advertisement
तीनही विजेत्यांविषयी थोडक्यात माहिती:
मेरी ई. ब्रंकॉ: अमेरिकन वैज्ञानिक, जीन संशोधन क्षेत्रात काम.
फ्रेड राम्सडेल: ब्रिटिश मूळचे वैज्ञानिक, इम्यून सिस्टीम तज्ज्ञ.
शिमोन साकागुची: जपानी वैज्ञानिक, टी-सेल्सच्या शोधासाठी प्रसिद्ध.
या संशोधनामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजले असून वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने हा मोठा टप्पा मानला जातो.
GLP-1: नोबेलसाठी प्रमुख दावेदार
एक्स्पर्ट्सच्या मते, अशा काळात जेव्हा जगभरात एक अब्जांहून अधिक लोक स्थूलतेशी (Obesity) झुंज देत आहेत, ग्लूकागॉन-लाइक पेप्टाइड-1 (GLP-1) नावाच्या हार्मोनवरील संशोधनाला विशेष सन्मान मिळण्याची शक्यता होती.
या हार्मोनवरील संशोधनामुळे ओजेम्पिक (Ozempic), वेगोवी (Wegovy) आणि मौनजारो (Mounjaro) यांसारख्या औषधांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. या औषधांनी स्थूलता आणि मधुमेहाच्या उपचारात क्रांतिकारक बदल घडवले आहेत.
GLP-1 संशोधनात अनेक वैज्ञानिकांचे योगदान असल्यामुळे नेमके कोण या पुरस्काराचे हकदार ठरतील हे ठरवणे कठीण आहे. तरी काही नावे चर्चेत होती डॅनिश डॉक्टर जेन्स जुल होल्स्ट, हार्वर्ड विद्यापीठातील प्रोफेसर जोएल हॅबेनेर, कॅनडाचे एंडोक्रिनोलॉजिस्ट डॅनियल ड्रकर आणि यूगोस्लावियन वंशाची अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ स्वेतलाना मोजसोव. तसेच घ्रेलिन हार्मोनवर संशोधन करणारे जपानी वैज्ञानिक केंजी कांगावा आणि मासायासु कोजिमा यांनाही नोबेलसाठी संभाव्य उमेदवार मानले जात होते.
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कारांची स्थापना 1895 साली झाली आणि प्रथम पुरस्कार 1901 साली देण्यात आला. 1901 ते 2024 दरम्यान वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात एकूण 229 वैज्ञानिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार वैज्ञानिक आणि शोधक अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार दिले जातात. सुरुवातीला फक्त भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमध्ये नोबेल दिले जात होते. नंतर अर्थशास्त्र (Economics) या क्षेत्रालाही यात समाविष्ट करण्यात आले.
नोबेल प्राइजच्या अधिकृत वेबसाइटनुसार कोणत्याही क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या व्यक्तींची नावे 50 वर्षांपर्यंत गोपनीय ठेवली जातात.
मराठी बातम्या/विदेश/
Nobel Prize In Medicine 2025: शरीर स्वतःवर का हल्ला करत नाही? या रहस्याचा उलगडा करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना नोबेल गौरव
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement