एअर स्ट्राइकच्या भीतीने पाकिस्तान बिथरला, इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग; भीतीने घेतले 8 मोठे निर्णय

Last Updated:

भारताने घेतलेल्या कडक निर्णयांवर संतप्त पाकिस्तानने आज एकतर्फी कारवाया करत युद्धजन्य इशारे दिले आहेत. पाण्यापासून सीमांपर्यंत आणि करारांपासून आंतरराष्ट्रीय हद्दींपर्यंत – भारतावर सर्व बाजूंनी दबाव आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे.

News18
News18
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांवर पाकिस्तानने आज आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक द्विपक्षीय करार रद्द करत युद्धजन्य पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. भारताने 'इंडस जलसंधी' स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय युद्धाची पूर्वतयारी समजून घेतला आहे. कोणत्याही प्रकारच्या पाण्याच्या प्रवाहात बदल झाला तर त्याला 'युद्धाचा हल्ला' समजले जाईल, असा थेट इशारा पाकिस्तानकडून देण्यात आला आहे.
पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या प्रमुख निर्णयांमध्ये हे समाविष्ट आहेत:
>इंडस जलसंधीचा भारताने केलेला निलंबन पाकिस्तानने फेटाळला असून कोणताही पाण्याचा प्रवाह वळविला गेला तर तो थेट युद्ध मानला जाईल.
>शिमला करार आणि सर्व द्विपक्षीय करार पाकिस्तानने तात्काळ निलंबित केले. जोपर्यंत भारत आपली भूमिका बदलत नाही.
भारताचं युद्धजन्य पाऊल, जगाच्या नजरा दिल्लीकडे; समुद्रातून 'सर्जिकल' इशारा
>वाघा सीमास्थळ तात्काळ बंद. परत फक्त ३० एप्रिल २०२५ पर्यंतच परवानगी.
advertisement
>भारतीय नागरिकांसाठी सर्व सार्क व्हिसा रद्द, केवळ शीख यात्रेकरूंना सूट; विद्यमान SVES व्हिसाधारकांना 48 तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश.
>भारतीय संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना 'persona non grata' घोषित. 30 एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडण्याचे निर्देश; भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचारी संख्या 30 वर आणली.
>पाकिस्तानच्या हवाई हद्दीत भारतीय मालकीच्या कोणत्याही विमानाला प्रवेश बंदी.
>भारतासोबतचा सर्व व्यापार तात्काळ बंद. तिसऱ्या देशाद्वारे होणाऱ्या व्यापारासह.
advertisement
>राष्ट्रीय सार्वभौमत्वावर कोणताही हल्ला झाल्यास ‘फुल-स्पेक्ट्रम’ प्रत्युत्तर देण्याची पाकिस्तानची घोषणा.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
एअर स्ट्राइकच्या भीतीने पाकिस्तान बिथरला, इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग; भीतीने घेतले 8 मोठे निर्णय
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement