plane crash: 23000 फूट उंचीवरून कोसळलं होतं विमान; 40 जण जिवंत जळाले

Last Updated:

त्या फ्लाइटमध्ये 42 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. त्यामध्ये सहा मुलांचाही समावेश होता.विमानाचा अपघात झाल्यानंतर 34 प्रवासी आणि सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

News18
News18
साओ पावलो: ब्राझीलमधल्या साओ पावलो राज्यात शुक्रवारी रात्री एका प्रवासी विमानाचा अपघात झाला. हे विमान निवासी भागात कोसळलं. विमानातल्या सर्व 61 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने 10 वर्षांपूर्वी झालेल्या एका विमान अपघाताच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. तो भीषण विमान अपघात 10 ऑगस्ट 2014 रोजी इराणमध्ये घडला होता. त्या फ्लाइटमध्ये 42 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. त्यामध्ये सहा मुलांचाही समावेश होता. विमानाचा अपघात झाल्यानंतर 34 प्रवासी आणि सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. 23 हजार फूट उंचीवरून खाली कोसळताच विमानाचा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. त्यात सुमारे 40 जण जिवंत जळल्यामुळे मरण पावले. आठ प्रवासी गंभीररीत्या भाजले होते.
इराणची राजधानी तेहरान इथल्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सेपहान एअरलाइन्सची फ्लाइट 5915 इराणमधल्या दक्षिण खोरासान प्रांतातल्या तबास शहराकडे निघाली होती. ही देशांतर्गत फ्लाइट होती. 10 ऑगस्ट 2014 रोजी उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत हे विमान कोसळलं आणि क्रॅश झालं. टेक ऑफ करताना उजव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं इराणच्या नागरी उड्डाण संघटनेने म्हटलं होतं.
advertisement
advertisement
क्रू मेंबर्स आणि पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समजल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करता आलं नाही. हेदेखील अपघाताचं एक कारण होतं. दिशाभूल करणाऱ्या विमान उड्डाण पुस्तिकेलादेखील (AFM) तपासकर्त्यांनी दोष दिला. उड्डाणाच्या वेळी विमानाचं वजन 190 किलोने जास्त होतं. विमानातलं इंधन गरजेपेक्षा 500 किलोने जास्त होतं. ताशी 224 किमी वेगाने उड्डाण करण्याऐवजी विमानाने ताशी 219 किमी वेगाने उड्डाण केलं होतं. विमानाची उंची अचानक एवढी कमी झाली, की पायलट्सना काहीही करता आलं नाही.
advertisement
सेपहानच्या फ्लाइट 5915 ने 10 ऑगस्ट 2014 रोजी सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी उड्डाण केलं होतं. वळणाच्या अवघ्या दोन सेकंद आधी विमानाचं उजवं इंजिन निकामी झालं. क्रूने ताबडतोब आणीबाणी घोषित केली आणि ताबडतोब डावीकडे वळून विमानतळावर परत जाण्याचा प्रयत्न केला. को-पायलट एटीसी अधिकाऱ्यांना इंजिनच्या स्थितीची माहिती देत राहिला. तेवढ्यात विमान अचानक थांबलं आणि वेगाने खाली येऊ लागलं. पश्चिम तेहरानमधल्या मिना ग्लास बुलेवार्डजवळच्या निवासी भागात हे विमान कोसळलं.
advertisement
ऑइल टँकच्या तारा तुटल्याने विमानाला आग लागली. इंजिन आणि पंख विमानापासून वेगळे झाले. त्यानंतर विमान बुलेवार्डच्या काँक्रीट भिंतीवर आदळलं आणि स्फोट झाला. विमानतळावरचं आपत्कालीन पथक घटनास्थळी गेलं; मात्र गैरसमज आणि गैरव्यवस्थापनामुळे बचाव पथक वेळेवर पोहोचू शकलं नाही. विमानाच्या ढिगाऱ्याखालून किमान 11 प्रवाशांना जिवंत बाहेर काढण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
plane crash: 23000 फूट उंचीवरून कोसळलं होतं विमान; 40 जण जिवंत जळाले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement