आकाशात उडत असलेलं विमान गायब झालं अचानक! 2 दिवसांनंतर कळलं, धावत गेले जवान, पण...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
अलास्कामध्ये सेसना 208B ग्रँड कॅराव्हन विमान बेपत्ता झाले होते, ज्यामध्ये 10 लोक होते. विमानाचा मलबा सापडला असून, 10 लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत विमान अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या 10-15 दिवसांत तीन मोठे अपघात झाले आहेत. कधी आकाशात दोन विमानांची टक्कर होते, तर कधी विमान थेट मॉलवर कोसळतं. आता गुरुवारी (8 फेब्रुवारी) अलास्कामध्ये Cessna 208B Grand Caravan हे विमान अचानक गायब झालं. दोन दिवसांनी या विमानाचे अवशेष सापडले असून, त्यातील 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विमानाचे अवशेष कुठे सापडले?
अलास्कामध्ये बेपत्ता झालेल्या Cessna 208B Grand Caravan विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती अमेरिकेच्या कोस्ट गार्डने शुक्रवारी दिली. हे विमान नॉम (Nome) शहराच्या दक्षिण-पूर्व दिशेला 34 मैलांवर आढळले. हे विमान युनालक्लीट (Unalakleet) येथून नॉमकडे जात होते.
विमानातील प्रवासी आणि संभाव्य मृत्यू
मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. उर्वरित सात प्रवासी विमानाच्या ढिगाऱ्यात अडकले असण्याची शक्यता आहे. मात्र, विमानाच्या स्थितीमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे सध्या कठीण आहे. अलास्का राज्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात 9 प्रवासी आणि 1 वैमानिक होता.
advertisement
अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं?
नॉमच्या व्हॉलेंटिअर फायर डिपार्टमेंटनुसार, पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपर्क साधत सांगितलं होतं की, तो धावपट्टी साफ होईपर्यंत होल्डिंग पॅटर्नमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यानंतर काही वेळातच विमानाची उंची आणि वेग झपाट्याने कमी झाला आणि विमानाचा संपर्क तुटला.
अमेरिकेतील अपघातांची चौकशी सुरू
अमेरिकेत सध्या विमान अपघातांच्या घटना वाढत असून, अलास्कातील या दुर्घटनेच्या तपासासाठी नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन काम करत आहेत. याआधी वॉशिंग्टन डी.सी. येथे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान यांची आकाशातच धडक होऊन 67 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, फिलाडेल्फियामध्ये मीडिव्हॅक जेट कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेत हवाई सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अपघातांमुळे प्रशासनाची झोप उडाली असून, सुरक्षेच्या नियमांची पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
advertisement
हे ही वाचा : पॉर्न स्टारला 25व्या वर्षी आला Heart Attack; उपचार घेत असताना घडले भयंकर, कायमची झाली अपंग
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 08, 2025 4:27 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
आकाशात उडत असलेलं विमान गायब झालं अचानक! 2 दिवसांनंतर कळलं, धावत गेले जवान, पण...


