मध्यरात्री पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला; 11 अधिकाऱ्यांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की या हल्ल्यात 11 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
कराची : पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे, गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की या हल्ल्यात 11 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर अनेक पोलीस अधिकारी गायब असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये. हा हल्ला झाला तेव्हा हे सर्व पोलीस अधिकारी एका बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेच पोलिसांवर हल्ला झाला.
हा हल्ला पाकिस्तानच्या रहीम यार खान परिसरात झाला आहे, या हल्ल्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या ताफ्यातील एक गाडी खराब झाली होती, तीच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला केला. पोलिसांना बचावाची संधी देखील मिळाली नाही. दरोडेखोरांकडून पोलिसांवर रॉकेट लॉंचरने हल्ला करण्यात आला. त्यानंतर दरोडेखोरांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार देखील केला.
advertisement
चार पोलीस अधिकारी बेपत्ता
हा हल्ला इतका भीषण होता की या हल्ल्यामध्ये आकरा पोलीस अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अद्याप चार पोलीस अधिकरी बेपत्ता आहे, त्याचा शोध सुरू आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. हल्ला झाला तेव्हा पोलिसांच्या दोन वाहनांमध्ये वीस पेक्षा अधिक पोलीस होते, अशी माहिती समोर आली आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
August 23, 2024 7:46 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
मध्यरात्री पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला; 11 अधिकाऱ्यांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी


