9/11 सारखा पुन्हा हल्ला, 3 हायराइज इमारतींवर Killer ड्रोन धडकले, VIDEO

Last Updated:

रशियाच्या कजान शहरात झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यानंतर 9/11 च्या अमेरिकेतील हल्ल्याची आठवण पुन्हा एकदा झाली.

News18
News18
नवी दिल्ली: 9/11 हल्ल्याची आठवण करुन देणारी घटना पुन्हा घडली आणि त्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली. 9/11 सारखा पुन्हा हल्ला झाला. 3 हायराइज इमारतींवर killer ड्रोन धडकले. इतिहासातील सर्वात भीषण आणि विभत्स हल्ला 9/11 चा झाला होता. याच हल्ल्याची पुनरावृत्ती रशियाच्या कजान शहरात झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यानंतर 9/11 च्या अमेरिकेतील हल्ल्याची आठवण पुन्हा एकदा झाली.
रशियाच्या कजान शहरात 3 हायराइज इमारतींवर सीरियन किलर ड्रोन धडकले. त्यानंतर मोठी आग लागली. या हल्ल्यानंतर मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. रशियाने एक ड्रोनला टार्गेट करून नष्ट केल्याचं सांगितलं आहे.
advertisement
कजानमधील उंच इमारतींवर ड्रोन हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहेत. वेगवेगळ्या दिशांनी येणारे किलर ड्रोन (यूएव्ही) हवेत इमारतींवर आदळत असल्याचे स्पष्टपणे दिसतंय. इमारतीला ड्रोन आदळल्यानंतर मोठा स्फोटही झाला. या हल्ल्याचा थेट आरोप रशियाने युक्रेनवर केला आहे.
advertisement
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून हा ड्रोन हल्ला युक्रेनने केल्याचे म्हटले आहे.
रशियातून समोर आलेल्या माहितीवरून या इमारतींमध्ये रहिवासी राहत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे या हल्ल्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आणखी एका हल्ल्याच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून जवळपासच्या उंच इमारतीही रिकामी करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी रशियातील कझान शहरातील विमानतळावरही उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
9/11 सारखा पुन्हा हल्ला, 3 हायराइज इमारतींवर Killer ड्रोन धडकले, VIDEO
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement