गुगलला 250000000000000000000000000000000000 डॉलर्सचा दंड, अख्ख्या जगात एवढा पैसा नाही

Last Updated:

Russia Fines Google : टीव्ही चॅने्ल्सच्या युट्यूब चॅनेल्सवर गुगलकडून कारवाई केली गेली होती. त्या कारवाईविरोधात रशियातील न्यायालायने हा दंड ठोठावला.

News18
News18
क्रेमलिन : रशिया गेल्या दोन वर्षांपासून एकाच वेळी दोन युद्धांचा सामना करतंय. युक्रेनसोबत थेट लढाई सुरू आहे तर अमेरिकेसोबत आर्थिक युद्ध चालू आहे. युक्रेनसोबत लढाई सुरू होताच अमेरिकेने रशियावर एका पाठोपाठ एक निर्बंध घालण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी रशियाने अमेरिकन कंपनीला दंड ठोठावला आहे. सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या गूगलला रशियाने जगात जितका पैसा नाही तितका दंड ठोठावला आहे. रशियातील न्यायालयाने दंडात्मक कारवाई म्हणून जी रक्कम सांगितली ती इतकी आहे की तेवढे पैसे जगातसुद्धा नाहीत. त्याची आकडेमोड करणंही कठीण आहे.
रशियातील कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं की, गुगलला २.५ डेसिलियन डॉलर इतका दंड द्यावा लागेल. ही रक्कम इतकी मोठी आहे की एवढे पैसे पूर्ण जगाच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहेत. ही रक्कम २ आकड्याच्या वर ३६ शून्य लागतील एवढी आहे.अमेरिकन गणितानुसार त्यावर ३६ शून्य लागतात. ब्रिटिशांच्या गणितानुसार त्यात ६० शून्य लावावे लागतील.
advertisement
अमेरिकन डॉलरनुसार सांगायचं झालं तर 250000000000000000000000000000000000 इतक्या डॉलरचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम रुपयांमध्ये मोजणं कठीण आहे. अख्ख्या जगाचे पैसे एकत्र मोजले तरी या रकमेची बरोबरी होऊ शकणार नाही.
रशियातील आरसीबी न्यूजने सांगितलं की न्यायालयाने २०२० पासून गुगलला दररोज १ लाख रुबलच्या हिशोबाने दंड केला आहे. हा दंड गुगलकडून रशियन समर्थक tsargrad आणि RIA FAN ही युट्यूब चॅनेल बंद केल्या प्रकरणी केला आहे. दरदिवशीचा दंड आठवड्याला दुप्पट केला गेला. गेल्या दोन वर्षात दंडाची रक्कम २ डेसिलियन रूबल इतकी झाली.
advertisement
रशियन न्यायालायने गुगलला फटकारताना म्हटलं की, रशियन माध्यमांना युट्यूबवर त्यांच्या बातम्या प्रसारित करण्याची संधी दिली नाही. या प्रकरणी थर्ड पार्टी व्हिक्टिम अनेकजण आहेत. बहुतांश टीव्ही चॅनेल्सचा यामध्ये समावेश आहे. टीव्ही चॅने्ल्सच्या युट्यूब चॅनेल्सवर गुगलकडून कारवाई केली गेली होती. त्या कारवाईविरोधात रशियातील न्यायालायने हा दंड ठोठावला.
दंड ठोठावताना रशियातील न्यायालयाने म्हटलं होतं की, जर गुगलने रशियाच्या कायद्याचं ९ महिन्यात पालन केलं नाही तर त्यांच्यावर दररोज १ लाख रुबलचा दंड ठोठावला जाईल. हा दंड आठवड्याला दुप्पट होईल आणि दंडाच्या रकमेला कोणतीही मर्यादा नसेल. सप्टेंबरपर्यंत हा दंड १३ डेसिलियन रुबल इतका झाला होता.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
गुगलला 250000000000000000000000000000000000 डॉलर्सचा दंड, अख्ख्या जगात एवढा पैसा नाही
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement