PM शाहबाज यांच्यासमोरच दहशतवादावरुन जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं, चीनलासुद्धा टोला

Last Updated:

S Jaishankar in pakistan : एससीओ परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोरच भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून सुनावलं.

News18
News18
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे एससीओ परिषदेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. एससीओ परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोरच जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून सुनावलं. इस्लामाबादमध्ये एससीओ परिषदेत एस जयशंकर यांनी सीमारेषेवर दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला फटकारलं. पाकिस्तानने आत्मपरीक्षण करायला हवं की दोन्ही देशांमधले संबंध का बिघडले. एकतर्फी अजेंड्याने एससीओचा उद्देश पूर्ण होणार नाही असं म्हणत जयशंकर यांनी चीनला टोला लगावला.
एस जयशंकर म्हणाले की, विश्वास नाहीय किंवा सहकार्यात कमतरता आहे. जर मैत्री कमी झालीय शेजाऱ्यासारखं वागलं जात नसेल तर कारण शोधायला हवं. जयशंकर यांनी पाकिस्तानचं नाव न घेता स्पष्ट इशारा दिला. सीमेपलिकडून दहशतवात, फुटीरतावादाला खतपाणी घातलं गेलं तर व्यापार, उर्जेची देवाण-घेवाण आणि लोकांमध्ये संपर्क कसा वाढेल. कट्टरतावादाने कोणताही देश पुढे जात नाही. विकास आणि प्रगतीसाठी शांततेची गरज असल्याचं प्रतिपादन एस जयशंकर यांनी केलं.
advertisement
भारताकडून पाकिस्तानसोबतचे संबंध हे सामान्य रहावेत अशी इच्छा व्यक्त केली जाते पण यासाठी पाकिस्तानने दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण तयार करणं गरजेचं आहे. जयशंकर यांनी हे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी केलं आहे. एससीओ परिषदेत भाग घेण्यासाठी जयशंकर पाकिस्तानात पोहोचले आहेत. त्यांनी त्यांच्याच देशात पाकिस्तानला थेट इशारा देत सीमेवर होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावाद यामुळे व्यापार आणि संबंध वाढणार नसल्याचं म्हटलंय.
advertisement
जयशंकर यांनी चीनलासुद्धा सुनावलंय. सीपीईसी प्रोजेक्टचा उल्लेख न करता जयशंकर म्हणाले की, जर आपण जगातील निवडक परंपरा विशेषत: व्यापार आणि व्यापारी मार्गांना निवडलं तर सदस्य देश प्रगती करू शकणार नाहीत. एससीओ सदस्य देशांचं सहकार्य परस्परांचा आदर आणि समानता याच्या आधारावर व्हायला हवं. त्यासाटी सर्व देशच्या अखंडता आणि स्वायत्तता याला मान्यता द्यायला हवी. यासाठी प्रत्यक्ष भागिदारी निर्माण व्हायला हवी. एकतर्फी अजेंड्यावर पुढे गेलं नाही पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
PM शाहबाज यांच्यासमोरच दहशतवादावरुन जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं, चीनलासुद्धा टोला
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement