Ajith Kumar Car Accident: कार रेसिंग करताना अभिनेत्याचा भीषण अपघात, कारच्या चिंधड्या, पाहा व्हिडिओ

Last Updated:

Tamil Actor Ajit Kumar Car Accident: दक्षिणात्य सिनेसृष्टीचा ॲक्शन हिरो अजित कुमारच्या कारला दुबईत भीषण अपघात झाला आहे. कार रेसिंगदरम्यान हा अपघात झाला.

Ajith Kumar Car Accident: कार रेसिंग करताना अभिनेत्याचा भीषण अपघात, कारच्या चिंधड्या, पाहा VIDEO
Ajith Kumar Car Accident: कार रेसिंग करताना अभिनेत्याचा भीषण अपघात, कारच्या चिंधड्या, पाहा VIDEO
दिल्ली: दक्षिणात्य सिनेसृष्टीचा ॲक्शन हिरो अजित कुमारला खऱ्या आयुष्यात रेसिंगचा शौक आहे. अजित सध्या दुबईत आहे. दुबईत होणाऱ्या 24 तासांच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी तो दुबईत गेला आहे. या शर्यतीचं नाव 24H दुबई 2025 आहे. अजित कुमार यांच्या कारला मंगळवारी शर्यतीच्या सराव दरम्यान अपघात झाला आहे.
कारवरील नियंत्रण सुटल्याने कार बॅरियरवर जाऊन आदळली. मात्र, या अपघातात अजित थोडक्यात बचावला आहे. अभिनेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही, अजितच्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये, कार आदळताना बॅरियरवर दिसते. बॅरियरवर कार आदळताच कारचा पुढचा भाग उडून गेल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं. अपघातानंतर ट्रॅकवर उपस्थित असलेले कर्मचारी तातडीने अजितची मदत करतात आणि त्याला गाडीतून बाहेर काढतात हे व्हिडीओतून दिसून येत आहे.
advertisement
अजित कुमार हा 24H दुबई 2025 कार रेसिंगमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झाला होता. अपघातानंतर अजितच्या टीमने याला दुजोरा देत सांगितले की, 'होय, तो थोडक्यात बचावला. सरावाच्या वेळी दुपारी पावणे एकच्या सुमारास त्याची रेस कार बॅरियरला धडकली. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा पथकाने त्याला तातडीने मदत केली. त्यात बिघाड झाल्याने अजित दुसऱ्या गाडीत गेला होता. पुढेही त्यांनी सराव सुरू ठेवला. सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही.
advertisement

अजित कुमारचा कार अपघात व्हिडिओ

advertisement
अजित दुबई येथे होणाऱ्या 24H दुबई 2025 शर्यतीत सहभागी होत आहे. इथे अजित कुमार रेसिंग नावाची त्यांची स्वतःची रेसिंग टीम देखील आहे. या शर्यतीसाठी अजितकुमार त्याचे सहकारी मॅथ्यू डॉट्री, फॅबियन डफीक्स आणि कॅमेरॉन मॅक्लिओड यांच्यासोबत सराव करत आहे. ही शर्यत 11 ते 12 जानेवारी दरम्यान होणार आहे.
अजितने सप्टेंबर 2024 मध्ये त्याची रेसिंग टीम लॉन्च केली. याआधी त्याने फॉर्म्युला BMW एशिया, ब्रिटिश फॉर्म्युला 3 आणि FIA F2 चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता. त्याचा संघ युरोपमध्ये स्पर्धा करणार आहे. अजितला रेसिंगसोबतच बाइकचाही शौक आहे. 90 च्या दशकात नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिपने त्याने आपल्या रेसिंग कारकिर्दीला सुरुवात केली. अजित कुमार दशकाच्या विश्रांतीनंतर रेसिंगच्या दुनियेत परतत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Ajith Kumar Car Accident: कार रेसिंग करताना अभिनेत्याचा भीषण अपघात, कारच्या चिंधड्या, पाहा व्हिडिओ
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement