'मूर्ख राष्ट्रपती तुला...', LIVE कॅमेऱ्यासमोर ट्रम्प अन् झेलेन्स्की बारक्या लेकरासारखं भांडले, जगाला टेन्शन देणारा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Trump Zelensky Clash : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. त्यावेळी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला.
Donald Trump Zelensky Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत काही मिनिटांतच दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळालं. द्विपक्षिय बैठकीत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात चर्चा सुरू झाली. तेव्हा दोन्ही नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला. तुम्ही एकतर करार करा नाहीतर आम्ही बाहेर पडू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात झेलेन्स्की यांना बजावलं. तुम्ही मोठ्या संकटात आहात, तुम्ही इथून जिंकू शकत नाही, असं ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना म्हटलं.
ट्रम्प आणि झेलेन्स्की वाद
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्ध आता संपत आहे. दोन्ही देशांमधील समाप्तीचा करार अंतिम टप्प्यात आहे. यातून अमेरिका युक्रेनमधील दुर्मीळ खनिजे खरेदी करण्यासाठी करत असलेला करार न्याय असल्याचे अमेरिकेचं मत आहे. पण युक्रेनला ही गोष्ट मान्य नाही.
डोनाल्ड ट्रम्पचे आरोप
तुम्ही लाखो लोकांच्या जीवनाशी जुगार खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहात. तुम्ही जे करत आहात ते देशाचा खूप अपमान करणारे आहे. तुमचा देश मोठ्या संकटात आहे. तुम्ही हे युद्ध जिंकताना दिसत नाही. तुम्हाला यातून बाहेर पडण्याची खूप चांगली संधी आहे, असं डोनाल्ड ट्रम्प झेलेन्स्की यांना मोठ्या आवाजात सांगताना दिसले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. त्यावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असं झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना सांगितलं आहे.
advertisement
advertisement
डोनाल्ड ट्रम्पचे तडकाफडकी निर्णय
दरम्यान, दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे एकामागोमाग एक मोठे निर्णय घेत आहेत. बुधवारी ट्रम्प यांनी पहिली कॅबिनेट बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी युक्रेनबाबत मोठे विधान केलं होतं. युक्रेनचे ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याचा स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असं ट्रम्प म्हणाले होते. दोन्ही देशांमध्ये हजारो अब्ज डॉलरचे करार होऊ शकतात, असं शक्यता होती. मात्र, युक्रेनने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
advertisement
दरम्यान, पोलिश पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी सोशल मीडियावर झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा दर्शवला. तुम्ही एकटे नाही आहात, असं म्हणत युक्रेनला पाठिंबा दिला. तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्विटरवरून रशियाविरुद्ध हल्लाबोल केला. त्यामुळे आता जागतिक पातळीवर वातावरण आणखी तापल्याचं पहायला मिळतंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 01, 2025 7:23 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
'मूर्ख राष्ट्रपती तुला...', LIVE कॅमेऱ्यासमोर ट्रम्प अन् झेलेन्स्की बारक्या लेकरासारखं भांडले, जगाला टेन्शन देणारा Video