Tsunami Alert: प्रलयाचा अलर्ट! टोंगामध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी इशारा; भारताला किती धोका

Last Updated:

Tsunami warning: टोंगा बेटाजवळ 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. टोंगा हा भूकंप व ज्वालामुखींसाठी संवेदनशील प्रदेश आहे.

News18
News18
टोंगा: दक्षिण प्रशांत महासागरातील टोंगा बेट समूहाजवळ 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) च्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र टोंगा बेटापासून काही अंतरावर 10 किलोमीटर खोलीवर होते.
त्सुनामीचा अलर्ट  
यूएस त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने टोंगा, फिजी आणि समोआ या बेटांसाठी संभाव्य त्सुनामीचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे.
टोंगा: भूकंप व ज्वालामुखींसाठी संवेदनशील प्रदेश
टोंगा हा 170 पेक्षा अधिक बेटांचा समूह आहे आणि भूकंप तसेच ज्वालामुखीच्या हालचालींसाठी संवेदनशील मानला जातो. 2022 मध्ये येथे हंगा टोंगा-हंगा हापाई ज्वालामुखीचा स्फोट झाला होता, ज्यामुळे प्रचंड हानी झाली होती.
advertisement
भारतावर परिणाम होणार का?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, भारताच्या किनारपट्टीसाठी या भूकंपामुळे कोणताही धोका नाही.
म्यानमारमध्ये भूकंपामुळे मोठी हानी
टोंगातील भूकंपाच्या दोन दिवस आधी म्यानमारमध्ये एका विनाशकारी भूकंपाने 1,700 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मांडले शहरात मृतदेहांमुळे दुर्गंधी पसरली असून, लोक स्वतःच्या हातांनी मलबा हटवून आपले नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने म्यानमारसाठी 'ऑपरेशन ब्रह्मा' हाती घेतले आहे आणि मदतकार्य सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Tsunami Alert: प्रलयाचा अलर्ट! टोंगामध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी इशारा; भारताला किती धोका
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement