अमेरिकेचा चीनवर पलटवार, ट्रम्प यांनी जुनी फाईल उघडली; चीनमध्ये खळबळ, व्हायरसवरुन मोठे षड्यंत्र
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Donald Trump on COVID-19 Lab Leak: डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला कोरोना विषाणूच्या उत्पत्तीवरून पुन्हा एकदा घेरले आहे. 5 वर्षांपूर्वीचा व्हायरल बाहेर काढून, त्यांनी चीनला जाब विचारण्यास भाग पाडले आहे. आता जिनपिंग काय उत्तर देणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद पुन्हा स्वीकारल्यापासून चीनबाबत कठोर भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी 5 वर्षांपूर्वी जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसला पुन्हा एकदा बाहेर काढून ड्रॅगनवर हल्ला चढवला आहे. अमेरिकन सरकारने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढत चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आता हा मुद्दा दाबला जाणार नाही. तर जगाला 'कोविडचे सत्य' सांगितले जाईल.
व्हाइट हाऊसने शुक्रवारी एक नवीन कोविड-19 वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटमध्ये थेट चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळेला कोरोना साथीसाठी जबाबदार धरले आहे. वेबसाइटनुसार विषाणूची उत्पत्ती वुहानच्या त्या प्रयोगशाळेतून झाली आहे. जी आधीपासूनच संशयास्पद संशोधन आणि सुरक्षा त्रुटींसाठी ओळखली जाते.
मंगळ ग्रहावर पूर्वी जीवन होते, मग कोणी केला Nuclear Attack? वैज्ञानिकांचा दावा
इतकेच नाही तर ट्रम्प प्रशासनाने या वेबसाइटद्वारे जो बायडेन, माजी वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची आणि जागतिक आरोग्य संघटनेवरही (WHO) हल्ला चढवला आहे. या सर्वांनी मिळून विषाणूच्या 'प्रयोगशाळा गळती' (Lab Leak Theory) सिद्धांताला दाबण्याचा प्रयत्न केला आणि सत्य लपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा आरोप आहे.
advertisement
बायडेन यांच्यावर हल्ला
वेबसाइटवर एक बॅनर आहे. ज्यावर लिहिले आहे- 'प्रयोगशाळा गळती: कोविड-19 ची खरी उत्पत्ती'. तसेच ट्रम्प यांच्या छायाचित्रासह असा दावा करण्यात आला आहे की, मागील सरकारे आणि माध्यमे 'सत्य लपवणे, संभ्रम निर्माण करणे आणि गैर-जबाबदारी' च्या मोहिमेत सामील होती.
चीनने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, अमेरिकेला मोठा धक्का; सर्वांची नजर भारतावर!
व्हाइट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, ही वेबसाइट कोविड-19 ची उत्पत्ती दर्शवते आणि डेमोक्रॅट्स आणि माध्यमांनी वैकल्पिक आरोग्य उपचार आणि प्रयोगशाळा गळती सिद्धांताला कसे बदनाम केले हे दाखवते. याशिवाय वेबसाइटमध्ये पाच प्रमुख मुद्दे सूचीबद्ध केले आहेत. जे कोविड-19 ची उत्पत्ती नैसर्गिक नव्हती, असे सुचवतात.
advertisement
5 मोठे दावे:
> कोरोना विषाणूमध्ये एक जैविक वैशिष्ट्य आहे. जे निसर्गात आढळत नाही.
> सर्व कोविड प्रकरणे एकाच स्रोतापासून पसरली. तर पूर्वीच्या साथींमध्ये अनेक स्पिलओव्हर घटना घडल्या होत्या.
> वुहान प्रयोगशाळेत जनुकीय सुधारणेचा (गेन ऑफ फंक्शन रिसर्च) इतिहास आहे. ज्यामध्ये सुपर-व्हायरस तयार केले जात होते.
> 2019 च्या शरद ऋतूत प्रयोगशाळेतील काही संशोधक कोविडसारख्या लक्षणांनी आजारी पडले होते.
advertisement
> आतापर्यंत विषाणूच्या नैसर्गिक उत्पत्तीचा कोणताही स्पष्ट वैज्ञानिक पुरावा समोर आलेला नाही.
वुहानमध्ये चीनची प्रमुख सार्स संशोधन प्रयोगशाळा आहे. जिथे पुरेसे जैवसुरक्षा न घेता गेन-ऑफ-फंक्शन संशोधन (जीन बदलणे आणि जीवांना सुपरचार्ज करणे) केले गेले आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे संशोधक 2019 मध्ये कोविडसारख्या लक्षणांनी आजारी होते. जे वेट मार्केटमध्ये कोविड-19 चा शोध लागण्यापूर्वी महिन्यांपूर्वी घडले. विज्ञानाच्या जवळपास सर्व मापदंडांनुसार, जर कोरोना विषाणूची नैसर्गिक उत्पत्तीचा कोणताही पुरावा असता. तर तो आतापर्यंत समोर आला असता. परंतु असे झाले नाही.
advertisement
आता जगाची नजर जिनपिंग यांच्यावर आहे. ते यावेळी पुन्हा गप्प बसणार की ठोस उत्तर देणार? ट्रम्प मात्र पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत आणि यावेळी ते माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत असे दिसते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 19, 2025 6:49 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेचा चीनवर पलटवार, ट्रम्प यांनी जुनी फाईल उघडली; चीनमध्ये खळबळ, व्हायरसवरुन मोठे षड्यंत्र


