प्रवासी विमान आणि सैन्याचं हेलिकॉप्टर हवेत धडकलं, दोन्ही Aircraft नदीत कोसळले, भयानक VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Plane Crashed in America: वॉशिंग्टन डीसीतील रीगन विमानतळाजवळ अमेरिकन एअरलाइन्सचं प्रवासी विमान आणि सैन्याचं ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर हवेत धडकून पोटोमॅक नदीत कोसळले आहे.
दिल्ली: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ बुधवारी भयंकर अपघात घडला आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं प्रवासी विमान हवेत असताना, या विमानाला सैन्याचं हेलिकॉप्टर धडकलं आहे. हवेत धडक झाल्यानंतर विमान आणि हेलिकॉप्टर दोन्ही कोसळून नदीत पडले आहेत. अपघातग्रस्त झालेलं प्रवासी विमान रीगन विमानतळावर लँड करत होतं, याचवेळी समोरून अमेरिकन सैन्यांचं ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आलं. या दोघांची हवेतच धडक झाली. हे प्रवासी विमान आणि सैन्याचं हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत कोसळले.
ज्या हेलिकॉप्टरशी विमानाची धडक झाली ते सिरोस्की एच-60 प्रकारचं हेलिकॉप्टर होते. तर मीडिया रिपोर्टनुसार, ज्या विमानाला अपघात झाला, ते एक लहान आकाराचं प्रवासी विमान होतं. यात 65 लोक बसू शकत होते. अपघातावेळी विमानात 60 प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. हे विमान कॅन्ससहून वॉशिंग्टनला येत होते.
एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी करत अपघाताची पुष्टी केली आहे. PSA द्वारे चालवले जाणारे अमेरिकन ईगल फ्लाइट 5342 कॅन्ससहून वॉशिंग्टनच्या रीगन विमानतळावर येत होतं. ज्याचा अपघात झाला आहे.
advertisement
BREAKING: Video shows 2 aircraft colliding over the Potomac River in Washington, D.C. pic.twitter.com/vVcyThS8Lr
— BNO News (@BNONews) January 30, 2025
अमेरिकन सिनेटर टेड क्रूझ म्हणाले की, या दुर्घटनेत काहीजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र विमानात किती लोक होते, याची अधिकृत माहिती आम्हाला अद्याप मिळाली नाही. या अपघातानंतर रीगन विमानतळावरची विमानसेवा रोखण्यात आली आहे. या विमान अपघातानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवेदन जारी करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. निवेदनातून त्यांनी रीगन विमानतळावर झालेल्या अपघाताची माहिती दिली असून मृत प्रवाशांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत, असंही निवेदनात म्हटलं आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
January 30, 2025 10:17 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
प्रवासी विमान आणि सैन्याचं हेलिकॉप्टर हवेत धडकलं, दोन्ही Aircraft नदीत कोसळले, भयानक VIDEO


