12 मिलियन म्हणजे किती? भारतीयांचा मोजताना गोंधळ का होतो? VIDEO एकदा पाहा म्हणजे कधीच विसरणार नाही

Last Updated:

काळजी करु नका, ही पद्धत सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगेल असा व्हिडीओ समोर आला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिले जातात. त्यांना लाइक देखील केलं जातं. या व्हिडीओवर लोकांची व्ह्यूज आणि लाइक्ससाठी चढा ओढ असते. जितके जास्त व्ह्यूज किंवा लाईक्स तितका तो व्हिडीओ जास्त लोकांपर्यंत पोहोचला आणि तितकेच जास्त पैसे त्या क्रिएटरला मिळतात.
रिल्सचे व्ह्यूज किंवा लाईक्स हे नेहमी मिलियन्समध्ये मोजले जातात. एवढंच नाही तर एखाद्या अकाउंटचे फॉलोअर्स देखील मिलियन्समध्ये असतात. आपण ते पाहून सहज म्हणतो अरे बापरे याचे 4 मिलियन्स फॉलोअर्स आहेत, 12 मिलियन फॉलोअर्स आहेत वैगरे वैगरे, पण तुम्हाला माहितीय का हे 12 मिलियन म्हणजे नक्की किती असतात?
म्हणजे जर लाख आणि कोटींमध्ये ही संख्या सांगायची झाली तर कशी सांगायची? याचं उत्तर अनेकांना देताच येणार नाही. कारण यामध्ये मोजमाप करणाऱ्या पद्धतींमध्ये मोठा गोंधळ आहे, ज्यामुळे भारतीय मिलियनच्या गणितामध्ये नेहमीच गोंधळतात.
advertisement
पण काळजी करु नका, ही पद्धत सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगेल असा व्हिडीओ समोर आला आहे. जो खरोखरंच खूप कामाचा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला गणिताचा सगळा खेळ लक्षात येईल आणि यानंतर पुन्हा आकडा सांगताना तुम्ही कधीही गोंधळणार नाहीत.
खरंतर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमुळे हा फरक आपल्या मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यामुळे हे सिस्टम समजून घेणं गरजेचं आहे.
advertisement
भारतीय अंक मापन पद्धतीमध्ये आपण कितीही मोठी संख्या असली तरी आपण मागून सर्वात आधी तीन संख्यांना सोडून कॉमा देतो आणि मग दोन-दोन करुन कॉमा देतो
उदा. 02,40,45,556 यामध्ये शेवटच्या 3 अंकानंतर कॉमा आणि मग दोन-दोन संख्यांनंतर डॉट येतोय. ज्यामध्ये ही संख्या दोन कोटी चाळीस लाख, पंचेचाळीस हजार पाचशे छप्पन अशी होते.
advertisement
तर अंतरराष्ट्रीय अंकमापन पद्धतींमध्ये थोडं वेगळं कॅल्युलेशन असतं. यामध्ये शेवटच्या तिन अंकांनंतर कॉमा असतो, पण त्यानंतर येणाऱ्या संख्या मध्येही तिन-तिनच्या गॅपनंतर कॉमा असतो. उदा. 024,045,556 यामध्ये शवटचे तीन अंक भारतीय पद्धतीने मोजले जातात. आणि त्यानंतरचे तिन हे K मध्ये मोजले जातात आणि त्यानंतरचे तिन हे M किंवा मिलियनमध्ये मोजले जातात. म्हणजेच 024 M, 045 K,556 म्हणजेच ही संख्या तुम्ही 24 मिलियन, 45K, पाचशे छप्पनं अशीच मोजाल.
advertisement
आता तुम्हा थोडं कळलं असेल पण याला आणखी सोप्या पद्धतीने समजण्यासाठी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो एका गणिताच्या शिक्षकांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गजानन राऊत यांनी सोप्या शब्दात गणिताची आकडेवारी समजून सांगितली आहे आणि आपला गोंधळ कायमचा दुर केला आहे.
advertisement
gajanan_raut_motivation या इंस्टा अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यांच्या या व्हिडीओने अनेकांचं कन्फ्यूज दूर केलं आहे. त्यामुळे आता कोणालाही मिलियन म्हणजे नक्की किती असं विचारलं तर उत्तर सांगता येईल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
12 मिलियन म्हणजे किती? भारतीयांचा मोजताना गोंधळ का होतो? VIDEO एकदा पाहा म्हणजे कधीच विसरणार नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement