तो 19 मिनिटांचा Viral Video; शेअर कराल तर तुरुंगात जाल, पोलिसांनी केलं सावध!

Last Updated:

19 Minutes Viral Video : एका पोलीस अधिकाऱ्याने अलीकडेच इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या ‘19 मिनिटांचा व्हिडिओबद्दलचं सत्य उघड केलं आहे. त्यांनी तो शेअर करणाऱ्यांना एक इशारा देखील दिला आहे.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
नोव्हेंबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात 19 मिनिटांचा एक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय बनला. ही लीक झालेली क्लिप व्हायरल होताच इंटरनेट सेन्सेशन बनली आणि चर्चेचा विषय बनली. ती नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह आणि असंवेदनशील मानली जात होती. आता एका पोलीस अधिकाऱ्याने अलीकडेच इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या ‘19 मिनिटांचा व्हिडिओबद्दलचं सत्य उघड केलं आहे. त्यांनी तो शेअर करणाऱ्यांना एक इशारा देखील दिला आहे.
19 मिनिटांचा व्हिडिओ, ज्याला सापडला त्याने तो मोठ्या प्रमाणात शेअर केला. अनेक लोक इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या आणि साम्य असलेल्या चेहऱ्याच्या मुलींना टार्गेट करत आहेत आणि त्यांच्या अकाऊंट्सवर अत्यंत वाईट कमेंट्स करत आहेत.
advertisement
रील बनवणाऱ्या अनेक तरुणींना या व्हिडिओमधील व्यक्तींशी साम्य असल्याच्या कारणावरून सोशल मीडियावर बदनामी आणि अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओ खुलेआम मागितला जात आहे, त्यासाठी लोक 500 ते 5000 रुपयांपर्यंतचे पैसे देण्याचे दावेही करत आहेत, जे कायद्याचं गंभीर उल्लंघन आहे.
पहिला व्हिडिओ लीक झाल्यानंतर बरेच लोक एआयने तयार केलेले भाग 2 आणि भाग 3 चे व्हिडिओ देखील शेअर करत होते. पण आता एका पोलीस अधिकाऱ्याने याचे परिणाम काय होतील ते सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवर ही रील पोस्ट करताना @vardiwala0007 नावाच्या हँडलने लिहिलं की, "भारतीय पोलिसांकडून तातडीने संदेश."
advertisement
पोलिसाने सांगितलं, 'व्हायरल होत असलेला 19 मिनिटांचा व्हिडिओ हा एआय जनरेटेड व्हिडिओ आहे. जर तुम्हाला व्हिडिओ एआय जनरेटेड आहे की नाही हे देखील तपासायचं असेल, तर siteengine.com ही एक साइट आहे, तुम्ही त्यावर जाऊन ते तपासू शकता.'
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Amit (@vardiwala0007)



advertisement
पोलिसांनी पुढे म्हटलं आहे की, "जर तुम्ही असे व्हिडिओ कोणासोबत शेअर केले तर तुमच्यावर आयटी कायद्याच्या कलम 67, 67अ आणि 66 अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो. यामुळे दंड आणि 3 वर्षांपर्यंतची जेल होऊ शकते. कारण एखाद्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याने किंवा असे व्हिडिओ शेअर केल्याने तुमच्याविरुद्ध खटला भरला जाऊ शकतो."
view comments
मराठी बातम्या/Viral/
तो 19 मिनिटांचा Viral Video; शेअर कराल तर तुरुंगात जाल, पोलिसांनी केलं सावध!
Next Article
advertisement
Local Body Election : नगर परिषद, नगरपालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर
नगर परिषद, नगर पालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर
  • नगर परिषद नगरपालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर

  • नगर परिषद नगरपालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर

  • नगर परिषद नगरपालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर

View All
advertisement