26 व्या वर्षी 22 मुलांची आई, करोडपती नवरा तुरुंगात, महिलेला अजून हवीत मुलं
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
तिची सर्वात मोठी मुलगी व्हिक्टोरिया आठ वर्षांची आहे. ती तिच्या आधीच्या रिलेशनशिपमधील जोडीदासासोबतच्या नात्यातून नैसर्गिकरित्या जन्माला आली होती.
जगात जिथे अनेक स्त्रियांना एकदाही मातृत्वाचा अनुभव घेता येत नाही, तर दुसरीकडे काही स्त्रिया दरवर्षी मुलं जन्माला घालून आपलं कुटुंब वाढवतात. पण एका महिलेला मुलांची इतकी आवड आहे की ती पाच-दहा नाही तर तब्बल 22 मुलांची आई झाली आहे. तुर्कीतील एका श्रीमंत माणसाची पत्नी क्रिस्टिना ओझटर्क ही अवघ्या 26 वर्षांची आहे, पण सरोगसीच्या माध्यमातून ती 22 मुलांची आई झाली आहे. रशियन वंशाच्या या ब्लॉगरने मार्च 2020 ते जुलै 2021 दरम्यान तिचा श्रीमंत व्यापारी पती गॅलिपबरोबर (वय 57 वर्षे) 21 सरोगेट बाळांचं जगात स्वागत केलं. इतकी मुलं असूनही आणखी मुलं हवी आहेत, असंही क्रिस्टिनाने म्हटलं आहे.
तिची सर्वात मोठी मुलगी व्हिक्टोरिया आठ वर्षांची आहे. ती तिच्या आधीच्या रिलेशनशिपमधील जोडीदासासोबतच्या नात्यातून नैसर्गिकरित्या जन्माला आली होती, क्रिस्टिनाकडे लहान मुलांचे एक मोठे कुटुंब आहे. रशियन फसवणुकीच्या तपासाअंतर्गत मे महिन्यात गॅलिपला अटक झाली, त्यानंतर तीन वर्षांच्या सर्वांत लहान मुलासह इतर मुलांचे संगोपन त्यांची आई करत आहे.
”मुलं विकत घेण्याच्या” आरोपांमध्ये ट्रोल केल्यानंतरही जॉर्जियामधील ही क्रिस्टिना आई होणं थांबवण्याच्या विचारात नाही. तिला बाळांचा तिहेरी आकडा गाठायचा आहे, असं क्रिस्टिनाने म्हटलं आहे. तिचा नवरा आठ वर्षांपासून तुरुंगात आहे. पण सुदैवाने मुलांची आवड असलेल्या क्रिस्टिना या 26 वर्षांच्या महिलेला मदत करण्यासाठी 16 लिव्ह-इन नॅनीजची फौज आहे, त्या मुलांचा सांभाळ करण्यास तिला मदत करतात.
advertisement
दोघांची पहिली भेट रुसमधील मॉस्को येथील एका क्लबमध्ये झाली होती. त्यावेळी त्यांनी जॉर्जियातील बटुमीमध्ये एक तीनमजली आलिशान बंगल्यात आपला संसार सुरू केला, गेल्या वर्षी फेब्रुवारीत क्रिस्टिनाने सेरोगेट्सना एक कोटी 43 लाख रुपये दिले होते. क्रिस्टिनाने 'बेबीज डायरी' नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. ज्यात तिने मुलांच्या आईच्या रुपात तिचे अनुभव सांगितले आहेत. तिच्यामते मुलांच्या पालनपोषणासंदर्भात बऱ्याच गोष्टी आधीच लिहिण्यात आल्या आहेत. पण आई-वडील रोज आपल्या मुलांना बेस्ट देण्यासाठी उपयोगी माहिती शोधतच असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 02, 2024 4:34 PM IST