77 वर्षांची ‘देसी दादी’ सोशल मीडियावर हिट; दररोज पोहते, व्यायाम करते, गंगाही केली पार

Last Updated:

अनेकांनी आपल्या आजी-आजोबांना पाहिलं असेल पाण्यात पोहताना, मज्जा करताना थोडंफार साहस दाखवताना. पण अनेकांसाठी तर असं दृश्य पाहाणं दुर्मीळ झालं आहे.

देसी दादी व्हायरल ऑन सोशल मीडिया
देसी दादी व्हायरल ऑन सोशल मीडिया
मुंबई : आपले आजीआजोबा आपल्याला त्यांच्या लहानपणीच्या किंवा तरुणपणातल्या गोष्टी, किस्से, अनुभव आवर्जुन सांगत असतात. त्यांच्या कहाण्या ऐकल्या की कधीकधी अस वाटतं किती मस्त आणि बिंधास्त आयुष्य ते जगलेत. पण आपल्याला हे कधी जमणार? असा प्रश्न देखील अनेकदा मनात येतो. अनेकांनी आपल्या आजी-आजोबांना पाहिलं असेल पाण्यात पोहताना, मज्जा करताना थोडंफार साहस दाखवताना. पण अनेकांसाठी तर असं दृश्य पाहाणं दुर्मीळ झालं आहे.
पण या आधुनिक युगात हरियाणातील एका आजीनं वयाच्या 77 व्या वर्षीदेखील अशी काही जिद्द आणि फिटनेस दाखवली आहे की ती सोशल मीडियावर स्टार बनली आहे. ‘देसी दादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियाणाच्या सबों दादी यांचा फिटनेस पाहून तरुणाईही थक्क झाली आहे.
सबों दादी यांना पोहायला सुरुवात वयाच्या 10 व्या वर्षीच केलं होतं. गावातल्या नहरमध्ये त्यांनी पोहणं शिकून ते त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवलं. आजही त्या दररोज सकाळी लवकर उठून पोहायला जातात, कसरत करतात आणि पारंपरिक पद्धतीने स्वतःला तंदुरुस्त ठेवतात.
advertisement
दादींच्या आयुष्यात अनेक रोमांचक अनुभव आहेत. त्यांनी स्वतः गंगा नदी पार केली असून आतापर्यंत तीन जणांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या पराक्रमांची गोष्ट आता गावातील लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी प्रेरणा बनली आहे.
दादींचा नातू चिरांग यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता, ज्यामध्ये त्या पोहताना आणि व्यायाम करताना दिसत होत्या. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि लोकांनी त्यांना ‘देसी मोटिवेशन’ आणि ‘फिटनेस आयकॉन’ असं म्हणायला सुरुवात केली.
advertisement
दादीच्या मते, आजची तरुण पिढी फास्ट फूड आणि मोबाईलमध्ये इतकी गुंतली आहे की ते आपली जीवनशैली विसरले आहे. त्या म्हणतात, "देसी घी, सरसोचं तेल, हिरव्या भाज्या आणि शुद्ध गहू हेच खरी आरोग्यदायी जीवनशैली आहे." त्यांच्या मुलानंही सांगितलं की, त्यांच्या घरात खास गहू पेरला जातो, जो फक्त दादी आणि नातवांसाठी वापरला जातो.
advertisement
या वयात जिथे अनेकांसाठी चालणं ही कठिण होतं, उठबस करणं ही कठिण होतं, त्या काळात सबों दादी पोहतात, व्यायाम करतात आणि आरोग्यपूर्ण जीवन जगतात. गावातील लोक त्यांचं अनुकरण करतात. या दादीला सोशल मीडियावर "हरियाणाची फिटनेस क्वीन" म्हणून देखील बोललं जातं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
77 वर्षांची ‘देसी दादी’ सोशल मीडियावर हिट; दररोज पोहते, व्यायाम करते, गंगाही केली पार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement