'त्या' मिठाईत गोडवा नाही, तर आहे आई-वडिलांचा संघर्ष! लेक परदेशात, तरीही लोकल ट्रेनमध्ये...

Last Updated:

Viral Post : लोकल ट्रेनमध्ये एक 80 वर्षांचे वृद्ध गृहस्थ त्यांच्या पत्नीने बनवलेली मिठाई आणि पोळी विकून उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर...

Viral Post
Viral Post
Viral Post : चेन्नईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून एक भावनिक दृश्य दिसत आहे. जवळपास 80 वर्षांचे एक वृद्ध गृहस्थ त्यांच्या पत्नीने बनवलेली मिठाई आणि पोळी विकताना दिसत आहेत. या वयातही उपजीविकेसाठी त्यांचा संघर्ष आणि जिद्द पाहून लाखो लोक इमोशनल झाले आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
एका सोशल मीडिया पोस्टनुसार, या गृहस्थांची 70 वर्षांची पत्नी घरी मिठाई बनवते आणि त्यांचे पती ती ट्रेनमध्ये विकतात. त्यांची मुलगी लंडनमध्ये राहते. एकाकीपणा आणि हताशपणे ते दोघेही जीवन जगत आहेत. एका प्रवाशाने ही मिठाई खाल्ल्यानंतर सांगितले की, "या मिठाईत केवळ चव नाही, तर प्रत्येक घासात त्यांचे प्रेम आणि संघर्ष जाणवतो."
advertisement
वेदांत समूहाचे अध्यक्ष मदतीसाठी पुढे
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी यावर भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले, "हे खूपच हृदयाला स्पर्श करणारं आहे. कृपया त्यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचा आणि त्यांना मदत करा."
advertisement
मुलांवर प्रश्नचिन्ह
या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिसाद देत त्यांचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्या मुलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोनिका जसुजा यांनी प्रश्न विचारला, "अशी कोणती मुले आहेत जी या मेहनती माणसाला एकटे सोडतील?" त्यांनी सर्वांना त्यांच्याकडून काहीतरी विकत घेऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
या जोडप्याच्या संघर्षाची कहाणी केवळ मिठाईपुरती मर्यादित नसून, त्यांच्या हिंमत आणि प्रेमाची साक्ष आहे. प्रवाशांना केवळ मिठाई विकत घेण्याचेच नाही, तर त्यांच्या संघर्षाचा सन्मान करण्याचे आवाहन केले जात आहे.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
'त्या' मिठाईत गोडवा नाही, तर आहे आई-वडिलांचा संघर्ष! लेक परदेशात, तरीही लोकल ट्रेनमध्ये...
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement