Ajab Gajab : खरंच चीनमधील डोंगर अंडी देतोय का? संशोधनात उघड झाला आश्चर्यचकित करणारा खुलासा

Last Updated:

स्थानिक लोक या दगडांना ‘अंड्याचे दगड’ म्हणतात आणि ते पिढ्यानपिढ्या या ठिकाणाला दैवी शक्तीचं स्थान मानतात.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : निसर्गाच्या अद्भुत रहस्यांबद्दल आपण नेहमीच ऐकतो कुठे आकाशात रंग बदलणारे डोंगर, तर कुठे झिरो गुरुत्वाकर्षण, जे लोकांना नेहमीच आश्चर्यचकीत करतं. पण एक अशी माहिती समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय रहाणार नाहीय चीनमधील एक डोंगर अंड देतो असं म्हणतात. ऐकायला जरी अजब वाटलं, तरी हे खरं आहे.
चीनच्या गुइझोऊ प्रांतातील गुलू नावाचं एक छोटं गाव या कारणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. दूरवर नजर टाकली तर ते एक साधं, शांत ग्रामीण गाव वाटतं हिरवेगार शेत, वळणावळणाचे रस्ते आणि उंचसखल डोंगर. पण जवळून पाहिलं तर इथलं दृश्य चकित करणारं आहे. येथील काही डोंगरांमधून दर काही दशकांनी अंड्यासारखे गुळगुळीत दगड बाहेर पडतात, जणू डोंगर स्वतः अंडे देत आहेत.
advertisement
स्थानिक लोक या दगडांना ‘अंड्याचे दगड’ म्हणतात आणि ते पिढ्यानपिढ्या या ठिकाणाला दैवी शक्तीचं स्थान मानतात. त्यांच्या मते, हे दगड फलनक्षमता आणि सुदैवाचे प्रतीक आहेत. आजही अनेक पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी गुलू गावात येतात.
पण वैज्ञानिकांनी आता या रहस्याचा उलगडा केला आहे. ‘जर्नल ऑफ जिओलॉजिकल रिसर्च’ मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ही घटना पूर्णपणे भूवैज्ञानिक (geological) आहे, कोणत्याही चमत्काराशी तिचा संबंध नाही.
advertisement
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
संशोधक सांगतात की या ‘अंडे देणाऱ्या चट्टानां’च्या आत कॅल्शियम कार्बोनेटसारखे खनिज वर्षानुवर्षे हळूहळू साचत जातात. लाखो वर्षांनंतर पाण्याचा दाब, तापमान आणि रासायनिक प्रक्रिया यांच्या परिणामाने हे खनिज कठीण दगडांच्या रूपात तयार होतात. जेव्हा वरची माती आणि खडक झिजतात, तेव्हा आतले गुळगुळीत दगड बाहेर दिसू लागतात आणि असं वाटतं की जणू डोंगर अंडे देतोय.
advertisement
या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत ‘कंक्रीशन’ (Concretion) असं म्हणतात. म्हणजेच मऊ दगडांच्या आत खनिजांच्या थरांनी तयार झालेला कठीण गोलाकार दगड. गुलू गावात दर 20 ते 30 वर्षांनी असे दगड तयार होतात, आणि त्यामुळे हा भाग आजही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
स्थानिक गाईड्स हे दृश्य अधिक रोमांचक बनवतात काही लोककथा, काही दैवी कहाण्या सांगतात पण खरं तर हे निसर्गाने घडवलेलं एक असामान्य चमत्कारिक भूवैज्ञानिक कोडं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Ajab Gajab : खरंच चीनमधील डोंगर अंडी देतोय का? संशोधनात उघड झाला आश्चर्यचकित करणारा खुलासा
Next Article
advertisement
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement