OMG! कमोड उघडलं आणि टॉयलेटखाली सांडपाण्याऐवजी दारूच दारू, कशी काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Alcohol Under Toilet : टॉयलेटखाली दारू.... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण एका घरातील टॉयलेटखाली खरंच दारू सापडली आहे. आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
अहमदाबाद : टॉयलेटखाली टॉयलेटच्या टाक्या असतात. जिथं टॉयलेटमधील मलमूत्र म्हणजेच सांडपाणी असतं. पण या टाकीत दारू असू शकते, असा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? टॉयलेटखाली दारू.... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण एका घरातील टॉयलेटखाली खरंच दारू सापडली आहे. आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
गुजरातच्या अहमदाबादमधील हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. असलाली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बरेजा गावातील चुनारा आवासमध्ये छापा टाकण्यात आला. 11 ऑगस्टे 2025, सोमवार रोजीचीही ही घटना. अहमदाबाद ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे एलसीबीच्या टीमने ही कारवाई केली. एलसीबीने गुप्त माहितीच्या आधारे दोन घरांवर ही धाड टाकली.
advertisement
रिपोर्टनुसार पोलिसांनी फरशीवर ठोकून पाहिलं तर आता आवाज येत होता. त्यानंतर त्यांनी कमोड तोडलं आणि आत पाहतो तर काय एक मोठा खड्डा होता. एक अधिकारी या खड्ड्यात उतरला आणि तिथं चक्क दारू सापडली. अशीच दारू स्विचबोर्ड, विजेचं सॉकेट अशा भिंतीवर बनवण्यात आलेल्या बॉक्सच्या मागेही सापडल्या आहेत.
टॉयलेट सीटखाली सापडली दारू, अधिकारीही थक्क झाले pic.twitter.com/sw3lplOWzB
— News18Lokmat (@News18lokmat) August 13, 2025
advertisement
एकूण 792 विदेशी दारूच्या बाटल्या, बियचे कॅन आणि ब्रिथर जप्त करण्यात आल्या आहेत. ज्याची किंमत जवळपास 2.76 लाख रुपये आहे. तसंच यात भारतात तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या विदेशी दारूच्या बाटल्या व्हिस्की, वोडका आणि बिअरचाही समावेश आहे.
166 दारूच्या बाटल्या पण किंमत ऐकून अधिकारीही हैराण
जुलैमध्ये मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बांद्रा विभागाने बनावट दारूचा तब्बल 20 लाखांचा साठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बांद्रा विभागाने खार पश्चिम भागात मोठी कारवाई केली. या परिसरात सद्गुरु कल्याण अपार्टमेंट नावाच्या इमारत फ्लॅट नंबर 201, 301 येथून तब्बल 20 लाख 33 हजार रुपये 648 रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. यात एकूण 166 दारूच्या बाटल्या असून यामध्ये 1000 मिलिलीटर च्या 48 बॉटल, 750 मिलिमीटरच्या 38, 700 मिलिमीटरच्या 28 बॉटल तसेच विविध ब्रँडच्या 750 मिलिटरीचे इम्पोर्टेड वाईन बॉटल जप्त करण्यात आलेल्या आहेत. याप्रकरणी बांद्रा विभागाच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
advertisement
धक्कादायक म्हणजे, एखाद्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट दारू तेही मुंबईतल्या खार सारख्या ठिकाणी सापडली आहे. जे मध्य सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोकांचं ठिकाण आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. अशा पद्धतीने इतक्या महागड्या दारू बनावत असणे, असे प्रकरण पहिल्यांदाच समोर आलेले आहे. त्यामुळे, या प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने गंभीर दखल घेतली असून यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केला आहे.
Location :
Gujarat
First Published :
August 13, 2025 2:26 PM IST