बापरे! 14किमी/सेकंद इतका स्पीड, पाऊस-चक्रीवादळाशिवाय आणखी एक मोठं संकट, काय आहे ते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Nasa alert about asteroid near earth : त्याचा ट्रॅक आणि आकार दोन्ही त्याला धोक्याच्या श्रेणीत आणतात. त्याच्या पुढील हालचाली आणि संभाव्य धोक्याचा अंदाज घेण्यासाठी शास्त्रज्ञ त्याचं बारकाईने निरीक्षण करत आहेत.
नवी दिल्ली : भारतात शक्ती चक्रीवादळाबाबत अलर्ट देण्यात आला आहे. तसंच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हे कमी की काय, त्यात आता आणखी एका संकटाबाबत सावध करण्यात आलं आहे. तब्बल प्रति सेकंद 14 किलोमीटर वेगाने अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने या संकटाबाबत अलर्ट केलं आहे.
एक खगोलीय राक्षस पृथ्वीकडे सरकत आहे, जर तो पृथ्वीला धडकल तर विनाश निश्चित आहे. त्याचं नाव 'लघुग्रह 2003 MH4' आहे. तो सुमारे 335 मीटर रुंद आहे, म्हणजेच जवळजवळ तीन फुटबॉल मैदानांइतका मोठा आहे. प्रति सेकंद 14 किलोमीटर वेगाने तो पृथ्वीच्या दिशेने येत आहे. नासाच्या मते, हा लघुग्रह 24 मे 2024 रोजी पृथ्वीजवळून जाईल.
advertisement
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) नुसार, हा लघुग्रह पृथ्वीपासून 6.68 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून जाईल. हे अंतर खूप वाटेल, पण अवकाश शास्त्राच्या भाषेत हे अंतर खूपच कमी आहे. नासा 150 मीटरपेक्षा मोठी आणि 7.5 दशलक्ष किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरून जाणारी कोणतीही वस्तू संभाव्य धोकादायक मानते. 2003 MH4 बाबत या दोन्ही गोष्टी आहेत.
advertisement
हा लघुग्रह अपोलो गटाचा भाग आहे. हा लघुग्रहांचा समूह आहे ज्यांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षा ओलांडतात. अपोलो गटात लघुग्रहांची संख्या 21000 पेक्षा जास्त आहे आणि भविष्यात यापैकी अनेकांशी टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेच कारण आहे की नासाचं सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) या सर्व गोष्टींचा सतत मागोवा घेत आहे.
advertisement
सध्या, 2003 MH4 पृथ्वीवर आदळणार नाही, परंतु त्याचा ट्रॅक आणि आकार दोन्ही त्याला धोक्याच्या श्रेणीत आणतात. त्याच्या पुढील हालचाली आणि संभाव्य धोक्याचा अंदाज घेण्यासाठी शास्त्रज्ञ त्याचं बारकाईने निरीक्षण करत आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की हा लघुग्रह दर 410 दिवसांनी एकदा सूर्याभोवती फिरतो, म्हणजेच त्याचा पृथ्वीशी सामना अजूनही शक्य आहे.
advertisement
2003 MH4 हा एकमेव नाही. यापूर्वी अपोफिस नावाचा लघुग्रह 2029 मध्ये पृथ्वीसाठी धोकादायक मानला जात होता. परंतु आता शास्त्रज्ञांनी ते सुरक्षित घोषित केलं आहे. त्याचप्रमाणे 2024 YR4 आणि 2025 FA22 नावाच्या लघुग्रहांवरही लक्ष ठेवलं जात आहे. विशेषतः, 2025 FA22 हे 2089 मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याचा अंदाज आहे. पण टक्कर होण्याची शक्यता फक्त 0.01% आहे.
Location :
Delhi
First Published :
May 17, 2025 8:25 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बापरे! 14किमी/सेकंद इतका स्पीड, पाऊस-चक्रीवादळाशिवाय आणखी एक मोठं संकट, काय आहे ते?