काय आहे भार्गवास्त्र? पाक ड्रोनचा करणार सर्वनाश, महाभारताशी कनेक्शन

Last Updated:

Bhargavastra : भारताने आज स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली भार्गवस्त्रची यशस्वी चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला आहे. हे क्षेपणास्त्र एक काउंटर ड्रोन प्रणाली आहे, जी महाभारत काळाशी जोडलेली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर नंतर भारत सतत आपली सुरक्षा मजबूत करत आहे. दरम्यान सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसने आता नवीन काउंटर ड्रोन सिस्टम भार्गवस्त्रची यशस्वी चाचणी घेतली, जी पूर्णपणे यशस्वी झाली. भार्गवस्त्र ही कमी किमतीची अँटी-ड्रोन प्रणाली आहे आणि ती नेहमी हार्ड किल मोडमध्ये काम करते. हार्ड किल मोड म्हणजे तो ड्रोन थेट नष्ट करतो. पण तुम्हाला माहिती नसेल भार्गवस्त्राचा संबंध महाभारत काळाशी आहे. भार्गवस्त्र हे महाभारतात वर्णन केलेल्या दैवी शस्त्रांपैकी एक आहे. भार्गवस्त्राबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
भार्गवस्त्र हे परशुरामांनी निर्माण केलेलं सर्वात शक्तिशाली शस्त्र. या शस्त्राचं नाव सप्तर्षींपैकी एक असलेल्या भृगु ऋषी ज्यांना भार्गव ऋषी असंही म्हणतात त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. भार्गवस्त्र हे इंद्रस्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली मानलं जात असे आणि ते महाभारत युद्धात वापरलं जाणारे सर्वात धोकादायक शस्त्र होतं. हे शस्त्र फक्त तोच थांबवू शकतो जो ते वापरू शकतो. या शस्त्रात ब्रह्मशीर्ष शस्त्राप्रमाणे प्रचंड शक्ती होती. या शस्त्रात संपूर्ण ग्रहाचा नाश करण्याची क्षमता होती कारण या शस्त्रात भृगु वंशाच्या परशुरामांसह सर्व ऋषींची शक्ती होती. या शस्त्राचा सामना फक्त नारायणास्त्रच करू शकत होतं. इतर कोणत्याही शस्त्रात ते थांबवण्याची ताकद नव्हती.
advertisement
परशुरामांनी कर्णाला दिलं होतं भार्गवस्त्र
महाभारतातील कथेनुसार भार्गवस्त्र महाभारत युद्धाच्या सतराव्या दिवशी हे शस्त्र वापरण्यात आलं होतं. जेव्हा कर्ण कौरव सैन्याचा सेनापती होता, तेव्हा तो युधिष्ठिर आणि त्याच्या सैन्याशी युद्ध करत होता. सेनापती कर्णाने युधिष्ठिराचा असा पराभव केला की त्याला युद्धभूमीतून पळून जावं लागलं. दुसरीकडे पराक्रमी अर्जुन देखील कौरव योद्ध्यांना एक एक करून मारत होता आणि त्यांच्या सैन्याचा नाश करत होता. अर्जुनला लढताना पाहून दुर्योधन घाबरला आणि कर्णाकडे गेला आणि त्याला काहीतरी करायला सांगितलं.
advertisement
कर्णाने भगवान परशुरामांनी दिलेलं विजय धनुष्य काढलं आणि भार्गवस्त्राचं आवाहन केलं. या शस्त्राचा परिणाम इतका जबरदस्त होता की कोट्यावधी बाण आणि शस्त्रं युद्धभूमीतून स्वतःहून बाहेर पडू लागली आणि पांडव सैन्याचा नाश करू लागली, ज्यामुळे सर्वत्र गोंधळ माजला. कुरुक्षेत्राची भूमी पांडव सैन्याच्या मृतदेहांनी भरली आणि रक्ताने माखली.
advertisement
अर्जुनातही हे शस्त्र रोखण्याची क्षमता नव्हती
भार्गवस्त्राचा परिणाम पाहून पांडव सैन्य आश्चर्यचकित झाले. या विनाशकारी, भयानक शस्त्राविरुद्ध काहीही करू शकले नाही. कुरुक्षेत्रात पांडव सैन्यासोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाने अर्जुनला हाक मारायला सुरुवात केली. अर्जुनही अशा स्थितीत होता जिथं तो या दिव्य शस्त्रामुळे काहीही करू शकत नव्हता आणि त्याने हे भगवान श्रीकृष्णालाही सांगितलं.
advertisement
या दिव्य शस्त्रापासून अर्जुनाला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कपिध्वज नावाचा रथ युद्धभूमीपासून दूर युधिष्ठिराच्या छावणीत घेऊन गेले. खरंतर याद्वारे भगवान श्रीकृष्णाने कर्णाला पराभूत करण्याची योजना आखली होती. जेणेकरून अर्जुन त्याचा मोठा भाऊ युधिष्ठिराला भेटेल तोपर्यंत कर्ण युद्धात पराभूत होईल आणि अर्जुन कर्णाला सहज मारू शकेल.
अर्जुनशी लढतानाही कर्णाने वापरलं भार्गवस्त्र
अर्जुनशी झालेल्या शेवटच्या युद्धात कर्णाने दुसऱ्यांदा भार्गवस्त्राचा वापर केला. जेव्हा अर्जुन आणि कर्ण एकमेकांशी लढत होते, तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते. दोन महान योद्धे एकमेकांशी लढत होते आणि एकमेकांवर अनेक दिव्य शस्त्रे सोडत होते. युद्धादरम्यान अर्जुनाने कर्णावर वज्रास्त्राचा वापर केला. वज्रास्त्राची शक्ती इतकी महान होती की त्याच्या आघातामुळे युद्धभूमीतून हजारो दैवी शस्त्रे आपोआप बाहेर पडू लागली, जी कर्णावर आदळली. कर्णाने वज्रास्त्राचा प्रतिकार करण्यासाठी भार्गवस्त्राचा वापर केला.
advertisement
शेवटच्या क्षणी प्रयोग करता आला नाही
भार्गवस्त्राने कर्णाच्या वज्रशास्त्राचे तुकडे केले आणि पांडव पक्षाचे हजारो सैनिक आणि सारथी मारले गेले. या शस्त्राच्या वापराने पांडवांची अजिंक्य सेना पूर्णपणे नष्ट झाली. भार्गवस्त्राचा नाश फक्त एकच शस्त्र करू शकत होतं आणि ते म्हणजे नारायणस्त्र. नारायणास्त्राशिवाय दुसरं कोणतंही शस्त्र भार्गवस्त्र नष्ट करू शकलं नाही. कर्णाला त्याच्या मृत्यूपूर्वी तिसऱ्यांदा भार्गवस्त्र वापरायचं होतं पण परशुरामाच्या शापामुळे हे शस्त्र त्याला वापरता आलं नाही.
advertisement
अत्याधुनिक भार्गवस्त्र
महाभारतातील भार्गवस्त्र या नावापासून प्रेरणा घेऊन भारत सरकारने एक अत्याधुनिक सूक्ष्म क्षेपणास्त्र आधारित काउंटर ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. ज्याला भार्गवस्त्र असं नाव देण्यात आळं आहे. काउंटर ड्रोन प्रणाली आधुनिक युद्धाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.
Bhargavastra : भारताने आज स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली भार्गवस्त्रची यशस्वी चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला आहे. हे क्षेपणास्त्र एक काउंटर ड्रोन प्रणाली आहे, जी महाभारत काळाशी जोडलेली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
काय आहे भार्गवास्त्र? पाक ड्रोनचा करणार सर्वनाश, महाभारताशी कनेक्शन
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement