General Knowledge : फाइटर जेट खरंच केरोसीनवर उडतात का? अनेकांना हे सत्य माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा असं ऐकायला मिळतं की फाइटर जेट केरोसीनवर चालतात. पण तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला आहे का की फायटर जेट नक्की कशावर चालतात? या दाव्यामागचं नेमकं सत्य काय?
मुंबई : भारत पाकिस्तान युद्धादरम्यान फाइटर जेट हा शब्द जास्त चर्चेत आला. यामागचं कारण ही तसंच आहे हे युद्धातील वेगवान आणि अत्याधुनिक यंत्र आहे. हे विमान वीजेच्या वेगाने शत्रूच्या भूमीत प्रवेश करून क्षणात टार्गेट करु शकतो. म्हणूनच यांना आकाशातील घातक अस्त्र मानलं जातं.
पण अनेकदा असं ऐकायला मिळतं की फाइटर जेट केरोसीनवर चालतात. पण तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला आहे का की फायटर जेट नक्की कशावर चालतात? या दाव्यामागचं नेमकं सत्य काय?
फाइटर जेटमध्ये खरंच केरोसीन वापरलं जातं का?
फाइटर जेटमध्ये थेट केरोसीन वापरलं जात नाही. या प्रकारच्या लढाऊ विमानांसाठी विशेष प्रकारचं 'एव्हिएशन ग्रेड फ्युएल' वापरलं जातं. हे इंधन केरोसीन बेस्ड असतं, म्हणजेच त्याचा मुख्य घटक केरोसीन असतो, पण त्यावर अनेक प्रक्रिया करून त्याला अत्यंत शुद्ध आणि सुरक्षित बनवलं जातं.
advertisement
त्यामुळे जरी त्याचा वास केरोसीनसारखा असला, तरी ते इंधन सामान्य केरोसीनपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि जास्त कार्यक्षम असतं.
एविएशन फ्युएलमध्ये काय वेगळं असतं?
एव्हिएशन फ्युएल हे खूप कमी तापमानातही गोठत नाही, कारण त्यात विशेष फ्रीझिंग एजंट्स मिसळलेले असतात. फाइटर जेट मोठ्या उंचीवर आणि प्रचंड वेगाने उडतात, त्यामुळे अशा इंधनाची गरज असते जे त्या तापमानातही स्थिर राहतं.
advertisement
याउलट, सामान्य केरोसीनमध्ये अशुद्धता असते आणि ते फार कमी तापमानात गोठू शकतं. त्यामुळे केवळ शुद्धतेच्या दृष्टीनेच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही सामान्य केरोसीनचा वापर अशक्य आहे.
हेच एव्हिएशन ग्रेड फ्युएल अनेक व्यावसायिक विमान कंपन्याही वापरतात. कारण त्याची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि स्थिरता हे हवाई प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
जरी काही लोकांना वाटतं की फाइटर जेट सामान्य केरोसीनवर चालतात, तरी प्रत्यक्षात हे इंधन विशेष प्रक्रियेनंतर तयार केलं जातं, जे फक्त हवाई जहाजांसाठीच वापरलं जातं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 15, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/Viral/
General Knowledge : फाइटर जेट खरंच केरोसीनवर उडतात का? अनेकांना हे सत्य माहितच नाही


