Board Exam Result : दहावीत नापास पण सेलिब्रेशन जोरात, आई-वडिलांनी दिला आयुष्याचा मोठा धडा, Video Viral
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Board Exam Result : अभिषेक नावाचा दहावीचा विद्यार्थी यंदाच्या परीक्षेत नापास झाला. पण त्याच्या आईवडिलांनी जे केलं, ते खरंच एक उदाहरण म्हणून समोर आलं आहे.
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल लागल्यावर अनेकांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. काही जणांचे चेहरे आनंदाने खुलले आहेत, तर काही जण निराश झालेत. आज महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल लागला, आणि अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून यश मिळवलं. घरोघरी सेलिब्रेशन सुरू आहे. पण दुसरीकडे काही विद्यार्थी अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे दुखी आहेत. पण अशावेळी या मुलांच्या घरच्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं, हे खूप गरजेचं आहे. ज्यामुळे मुलं मानसिक तणावात जाणार नाहीत.
अशाच एका प्रेरणादायक घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे, ही कर्नाटकमधील घटना आहे. तिथे अभिषेक नावाचा दहावीचा विद्यार्थी यंदाच्या परीक्षेत नापास झाला. पण त्याच्या आईवडिलांनी जे केलं, ते खरंच एक उदाहरण म्हणून समोर आलं आहे.
अभिषेकला 600 पैकी फक्त 200 मार्क मिळाले. पण घरच्यांनी त्याच्यावर रागवण्याऐवजी, उलट त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याचं ‘फेल सेलिब्रेशन’ केलं! एवढ नाही तर त्याचा केक कापला, सगळ्या कुटुंबाने एकत्र जमून त्याला धीर दिला आणि सांगितलं “तू परीक्षेत नापास झालास, पण आयुष्यात नाही.”
advertisement
VIDEO | Karnataka: Parents celebrate their son after he fails in Class 10 exam by cutting a cake to boost his morale in Bagalkote. He got 200 marks out of 600, which is 32 percent, below the passing marks. #Karnataka #Bagalkote pic.twitter.com/YJzSBm3Gvq
— Press Trust of India (@PTI_News) May 5, 2025
advertisement
अभिषेकचे वडील म्हणाले, “चुकलंय, पण चालेल... पुढच्या वेळी सुधारता येईल. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.”
आजच्या काळात, जेव्हा मुलं फेल झाली की अनेक घरात तणावाचं वातावरण होतं, अशावेळी या कुटुंबाने दिलेला सकारात्मक संदेश खूप मोठा आहे. अशा गोष्टी फक्त एका मुलाला नव्हे, तर अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना नव्याने विचार करायला भाग पाडतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 05, 2025 3:45 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Board Exam Result : दहावीत नापास पण सेलिब्रेशन जोरात, आई-वडिलांनी दिला आयुष्याचा मोठा धडा, Video Viral