काय सांगता! 5 सीटर कार, तीसुद्धा फक्त 3600 रुपयात; जाहिरात Viral

Last Updated:

एका प्रीमियम कंपनीची गाडी फक्त काही हजार रुपयांमध्ये विकली जात आहे. सध्याच्या काळात कोणतीही फोर व्हिलर खरेदी करण्यासाठी काही लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सोशल मीडियावरील जाहिरात बघून अनेकांना आश्चर्य वाटत आहेत.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : काळाच्या ओघात अनेक गोष्टी मागे पडतात. अनेक लोकांना अशा जुन्या गोष्टींबद्दल विशेष आवड वाढते. यामुळेच आजकाल काही लोक जुन्या गोष्टींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 50 ते 60 वर्षांपूर्वीची लग्नपत्रिका असो किंवा गाड्या, किराणा सामन आणि सोन्याच्या खरेदीची बिलं असो, अशा गोष्टी सोशल मीडियावर नेहमीच लक्ष वेधून घेतात. काही लोक याकडे आठवणी म्हणून बघतात तर नवीन पिढीला अशा गोष्टींचं आश्चर्य वाटतं. सध्या अशीच एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही जाहिरात एका गाडीची आहे. या जाहिरातीनुसार एका प्रीमियम कंपनीची गाडी फक्त काही हजार रुपयांमध्ये विकली जात आहे. सध्याच्या काळात कोणतीही फोर व्हिलर खरेदी करण्यासाठी काही लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सोशल मीडियावरील जाहिरात बघून अनेकांना आश्चर्य वाटत आहेत.
एका व्हायरल पोस्टमध्ये वर्तमानपत्रातील जाहिरातीचा फोटो दिसत आहे. सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम शेवरोले कार फक्त 2700 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, असं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं आहे. कच्चा रस्त्यांसाठी ही गाडी सर्वोत्तम असल्याचंही म्हटलं गेलं आहे. इतकंच नाही तर याच ब्रँडची फाईव्ह सीटर कार 3675 रुपयांना उपलब्ध आहे. एक जाहिरात लखनौमध्ये उपलब्ध असलेल्या कारची आहे. दुसरी जाहिरात कोलकाता, दिल्ली, लखनौ आणि दिब्रुगढपर्यंत कार डिलिव्हरी उपलब्ध करून देण्याबाबत आहे.
advertisement
सोशल मीडियावरील फोटो बघून ही जाहिरात जुन्या काळातील असल्याचं आपल्या लक्षात येतं. जाहिरातीमधील कारची मॉडेल्स 1936 मधील आहेत. या गाड्यांच्या तत्कालीन किमती जाहिरातीमध्ये दिसत आहेत. जवळपास शतकभरापूर्वीच्या या गाड्या असल्यामुळे किमतीतही मोठी तफावत दिसत आहे.
Photo : Instagram/carblogindia
फोटो : Instagram/carblogindia
advertisement
carblogindia नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करून रंजक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूजर म्हणाला, "मी श्रीमंत आहे, फक्त चुकीच्या शतकात जन्माला आलो." काही यूजर्सनी म्हटलं की, त्यावेळची ही किंमत सध्याच्या 3.6 कोटी आणि 2.7 कोटी रुपयांच्या बरोबरीची आहे.
advertisement
काही महिन्यांपूर्वी 1959 मधील सोने खरेदीचं बिल व्हायरल झालं होतं. त्यावरील 10 ग्रॅम सोन्याची किंमत सध्याच्या एक लिटर पेट्रोलच्या किमतीपेक्षा कमी होती.या बिलानुसार त्यावेळी 10 ग्रॅम सोन्याची किंमत केवळ 113 रुपये होती. 64 वर्षांपूर्वी एक किलो सोनं केवळ 11 हजार 300 रुपयांना मिळत होतं. सध्या शुद्ध सोन्याचा 75 ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
काय सांगता! 5 सीटर कार, तीसुद्धा फक्त 3600 रुपयात; जाहिरात Viral
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement