ChatGPT मुळे बदलले नशीब! या महिलेने फेडले 20 लाखांचे कर्ज, पण कसं? वाचा सविस्तर...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
डेलावेअरच्या रिअल इस्टेट एजंट जेनिफर ॲलन यांनी चॅट जीपीटीच्या मदतीने सुमारे $23,000 (₹20 लाख) क्रेडिट कार्ड कर्ज फेडण्याची प्रेरणादायी कथा समोर आली आहे. स्थिर उत्पन्न...
अमेरिकेतील डेलावेअरमध्ये राहणारी जेनिफर अॅलन नावाची एक रिअल इस्टेट एजंट आणि कंटेंट क्रिएटर महिलेनं तब्बल $23,000 म्हणजेच सुमारे 20 लाखांचं क्रेडिट कार्ड कर्ज ChatGPTच्या मदतीने फेडलं आहे. तिची ही प्रेरणादायी कहाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचं (AI) वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनातलं सामर्थ्य दाखवते.
असं वाढत गेलं कर्ज
35 वर्षांची जेनिफर अॅलन सांगते की, चांगली कमाई असूनही आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यामुळे ती कर्जाच्या जाळ्यात अडकली. “माझं उत्पन्न खूप होतं, पण पैसे हाताळण्याचं शहाणपण नव्हतं,” असं तिनं न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मुलीच्या जन्मानंतर वैद्यकीय खर्च वाढले, पालकत्वाची जबाबदारीही वाढली, आणि त्याचवेळी क्रेडिट कार्डवर अवलंबून राहावं लागलं. “आमचं जीवन फारशं आलिशान नव्हतं, पण गरजांसाठीच सगळी कमाई खर्च होत होती. आम्हाला कळलंच नाही, आणि कर्ज चढत गेलं,” असं ती म्हणते.
advertisement
ChatGPT मुळे मिळाली नवी वाट
आर्थिक परिस्थितीत बदल घडवण्यासाठी तिनं 30 दिवसांचं वैयक्तिक आर्थिक आव्हान (personal finance challenge) स्वीकारलं. दररोज छोटं एक पाऊल उचलून कर्ज कमी करण्याचा मार्ग ChatGPTनं तिला दाखवला.
AI ने हिले 'हे' प्रवाभी सल्ले आणि उपाय
- गरज नसलेल्या सबस्क्रिप्शन तिनं बंद केल्या.
- विसरलेल्या जुन्या खात्यांमधलं शिल्लक पैसे शोधले.
- घरात आधीच असलेल्या वस्तूंवर आधारित जेवणाचं नियोजन करून किराणा खर्च कमी केला.
- सक्रीय नसलेल्या खात्यातून 8.5 लाखांचा शोध
advertisement
ChatGPTच्या सल्ल्यामुळे तिनं आर्थिक अॅप्स आणि बँक खाती तपासली. त्यात तिला एक निष्क्रिय ब्रोकरेज अकाउंट सापडलं, ज्यात तब्बल $10,000 म्हणजेच सुमारे 8.5 लाख रुपये होते. एक वेळ अशीही होती, जेव्हा तीने केवळ घरातल्या सामानावर आधारित जेवण करून किराणा खर्चात 50000 रुपयांची बचत केली. या सगळ्या उपायांमुळे 30 दिवसांत तीने $12,078.93 म्हणजेच सुमारे 10.3 लाखांचं कर्ज फेडलं.
advertisement
या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या जेनिफर आता उर्वरित कर्ज फेडण्यासाठी आणखी एक 30 दिवसांचं आव्हान घेणार आहे. “हे काही मोठं आर्थिक धोरण नाही. दररोज त्याचं भान ठेवणं, लक्ष देणं, नोंदी ठेवणं, त्यावर बोलणं, हेच खरं आहे. आता मला माझ्या समस्या भितीदायक वाटत नाहीत,” असं ती म्हणाली.
अमेरिकेत वाढत चाललेल्या वैयक्तिक कर्जसंकटाच्या पार्श्वभूमीवर जेनिफरची ही वाटचाल अनेकांना प्रेरणा देणारी आहे. फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यू यॉर्कनुसार 2025 च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेतील घरगुती कर्ज $18.2 ट्रिलियनपर्यंत पोहोचलं आहे. जेनिफर अॅलन इतरांना सांगते, “तयार व्हायची वाट पाहू नका. सर्व उत्तरं असतील असंही वाटून घेऊ नका. मूळ समस्येला सामोरं जा, ती टाळू नका.”
advertisement
हे ही वाचा : 'या' देशात 70% मुस्लीम लोकसंख्या, तरीही 'बुरखा' घालण्यावर आहे बंदी! इतकंच नाहीतर 'हिजाब'ही...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 03, 2025 5:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
ChatGPT मुळे बदलले नशीब! या महिलेने फेडले 20 लाखांचे कर्ज, पण कसं? वाचा सविस्तर...