पिल्लांना वाचवण्यासाठी कुत्र्याची युक्ती, अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनाच थेट आणलं बोलावून
- Published by:Devika Shinde
- local18
Last Updated:
आश्चर्य म्हणजे आपले मुलं पाण्यातून वाहून जाणार आहेत. हे लक्षात येताच त्या पिल्लांची आई स्वत: अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांकडे गेली आणि तिने मदत मागितली.
मुंबई, 16 नोव्हेंबर : आई ही आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. आपल्या मुलांसाठी ती प्राणाची देखील पर्वा करत नाही. हे फक्त बोलण्यासाठी नाही तर एका आईने ते सिद्ध ही करुन दाखवलं आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एका मादा कुत्र्यानं आपल्या मुलांचे प्राणी वाचवले आहे.
आश्चर्य म्हणजे आपले मुलं पाण्यातून वाहून जाणार आहेत. हे लक्षात येताच त्या पिल्लांची आई स्वत: अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांकडे गेली आणि तिने मदत मागितली.
तसे पाहाता माणसांना प्राण्यांची भाषा कळत नाही आणि प्राण्यांना देखील आपली भाषा कळत नाही, पण असं असलं तरी देखील या आईने आपल्या भावना या अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांना पटवून दिली आणि त्यांना मदतीला घेऊन आली.
advertisement
एका पावसाळी सकाळी आई आपल्या चार पिल्लांसह झोपून होती, तेव्हा तिचे पिल्ल जागे झालेले नव्हते. दरम्यान, पावसाचा जोर वाढला आणि ते झोपलेल्या ठिकाणी पाणी वाहू लागले. परिस्थिती बिघडली आणि पाण्याची पातळी वाढू लागली आणि पिल्ले पावसाच्या पाण्याने वाहून गेली आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या आत पडली.
मादा कुत्रा स्ट्रॉम ड्रेनमध्ये प्रवेश करू शकली नाही आणि आपल्या पिल्लांना वाचवू शकली नाही म्हणून ती थेट अग्निशमन विभागाच्या कार्यालयात गेली आणि मदत मागण्यासाठी कर्मचाऱ्यांवर भुंकायला लागली. कर्मचाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचे समजले आणि ते कुत्र्याच्या मागे गेले. कुत्र्याने त्यांना स्ट्रॉम वॉटर ड्रेनमध्ये नेले आणि जेव्हा त्यांनी नाल्याखाली पाहिले तेव्हा त्यांना 4 पिल्ले थंडीने थरथरत असल्याचे दिसले.
advertisement
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्या पिल्लांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी चार पिल्लांची सुखरूप सुटका केली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. एका आईने आपल्या मुलांना वाचवण्यासाठी केले प्रयत्न आणि तिची बुद्धी या दोन्ही गोष्टींबद्दल अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि लोक अवाक् झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2023 7:41 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पिल्लांना वाचवण्यासाठी कुत्र्याची युक्ती, अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनाच थेट आणलं बोलावून