Viral Video : शांत गल्लीत कपलचा रोमान्स पाहाताच बाल्कनीतील काकांचा अनोखा प्रताप, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मुंबईत शाळकरी मुलांचा सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका काकांनी त्यांना पाहून असं काही काम केलं जे पाहून नेटकरीही हैरान झाले.
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही जोडपी प्रेमाच्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडेलेली असतात की आपण कुठे आहोत, याचं भान देखील त्यांना उरत नाही. यापूर्वी स्टेशनवर रोमान्स करणाऱ्या अनेक कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही शाळकरी मुले शाळेनंतर एका इमारतीच्या मागे रोमान्स करताना दिसतात. यावेळी एका काकांनी बाल्कनीतून त्यांना पाहिले आणि त्यांच्यासोबत असं काम केलं की पाहून तुम्ही हैरान व्हाल.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी एका शांत ठिकाणी आली. इथे लोक रहातात पण लोकांची वरदळ कमी असते. त्यामुळे त्यांना एकांत मिळेल असं त्यांना वाटलं. ज्यामुळे ते रोमान्य करु लागले. आश्चर्य म्हणजे ते एकाच वेळी तिघेही रोमान्स करत होते. त्यानंतर तरुणाने दुसऱ्या मुलीला उचलून घेतलं. पण तेवढ्यात समोरच्या इमारतीमधील काकांनी त्याचा भंग केला.
advertisement
advertisement
पहिल्या मजल्यावरून एक काका त्यांच्या या कृत्यावर लक्ष ठेवून होते, जसेच हे जोडपे रोमान्स करायला लगाले, तसे काकांनी बाल्कनीतून त्यांच्यावर पाण्याने भरलेली बादली रिकामी केली. अचानक अंगावर पाणी पडताच तिघेही घाबरतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेक युजर्सनी यावर संताप व्यक्त केला आहे. काहींनी या जोडप्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर काहींनी काकांचे कौतुक केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : शांत गल्लीत कपलचा रोमान्स पाहाताच बाल्कनीतील काकांचा अनोखा प्रताप, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण