Couple Viral Video : हे प्रेम की स्टंट शो? बॉयफ्रेंडचे घरचे आले म्हणून घाबरलेल्या गर्लफ्रेंडनं गच्चीवरुन घेतली उडी आणि....
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे, ज्यात बॉयफ्रेंडला भेटायला गेलेली एक तरुणी धाडसी निर्णय घेते. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मुंबई : प्रेमात असलेले तरुणतरुणी एकमेकांना भेटण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडतात. पण कधीकधी त्यांच्या या धाडसी पावलांमुळे अशी परिस्थिती निर्माण होते की अशावेळी ते जीवावर बेतणारे निर्णय घ्यायला देखील मागेपुढे पाहात नाहीत. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे, ज्यात बॉयफ्रेंडला भेटायला गेलेली एक तरुणी धाडसी निर्णय घेते. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसतं की एक तरुणी एका उंच इमारतीच्या गच्चीवर उभी आहे आणि काही सेकंदात ती अचानक खाली उडी मारते. ती थेट खालील मजल्यावर असलेल्या छज्ज्यावर जाऊन आदळते. काही क्षण ती हालचाल करत नाही आणि स्वत:ला सावरते आणि पुन्हा एकदा उडी मारुन कालच्या मजल्यावर येण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ती उडी मारण्याचा प्रयत्न करते आणि खाली पडते. तिथे तिला पळण्यात यश मिळालं की लागलं हे कळू शकलेलं नाही, पण प्रेमात लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात हे तर या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही हे देखील पाहू शकता ती घराच्या छतावर एक तरुण देखील उभा आहे. त्यालाच भेटण्यासाठी ही तरुणी तिथे आली असणार असा अंदाज बांधला जात आहे. त्यावेळी मुलाच्या घरचं कोणीतरी आलं असल्यामुळे तिला तिथून पळ काढावा लागला ज्यामुळे तिने इतका धाडसी निर्णय घतला असावा असं देखील सांगितलं जात आहे. सुदैवाने, तिला गंभीर इजा झाली नाही. परंतु हा क्षण इतका धक्कादायक होता की अनेकांनी श्वास रोखून व्हिडिओ पाहिला.
advertisement
हा धक्कादायक व्हिडिओ naresh_kumar_chadha नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं की, ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. पण अचानक त्याचे घरचे आले आणि ती गडबडीत गच्चीवरून उडी मारून पळून गेली. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधी काढला गेला हे कळू शकलेलं नाही.
advertisement
या व्हिडीओवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. एकानं कमेंट केलं "ही खरंच खतरों की खिलाड़ी आहे!", तर दुसऱ्यानं लिहिलं, "थोडं चुकलं असतं, तर जीवही जाऊ शकला असता." तिसरा म्हणतो "हे प्रेम आहे की स्टंट शो?"
हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण आता याच विचारात आहे की खरंच प्रेमासाठी इतकं धाडस खरंच योग्य आहे का?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 12, 2025 7:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Couple Viral Video : हे प्रेम की स्टंट शो? बॉयफ्रेंडचे घरचे आले म्हणून घाबरलेल्या गर्लफ्रेंडनं गच्चीवरुन घेतली उडी आणि....