Animal Video : हळूच पाण्यातून आली मगर, चित्त्यावर जीवघेणा हल्ला करत केलं ठार; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात अनेक धोकादायक आणि भयानक प्राणी आहेत. एकापेक्षा एक खतरनाक प्राणी तुम्हाला पहायला मिळतील. वन्य प्राणी आणि त्यांच्या हल्ल्यांच्या घटना तर खूपच थरारक असतात. ते प्राणी कधी कोणावर हल्ला करतील सांगू शकत नाही.
नवी दिल्ली : जगभरात अनेक धोकादायक आणि भयानक प्राणी आहेत. एकापेक्षा एक खतरनाक प्राणी तुम्हाला पहायला मिळतील. वन्य प्राणी आणि त्यांच्या हल्ल्यांच्या घटना तर खूपच थरारक असतात. ते प्राणी कधी कोणावर हल्ला करतील सांगू शकत नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांना लोक खूप घाबरतात आणि त्यांच्यापासून दूरच राहतात. प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये भर पडली असून आणखी एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये मगर अचानकपणे येऊन चित्त्यावर हल्ला करते. हे दृश्य पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
एक मगर चित्त्यावर हल्ला करून त्याला ठार मारते. हा हल्ला एवढा वेगवान आहे की चित्त्याला अजिबात समजत नाही आणि चित्ता आपला जीव गमावतो. हे दृश्य काही लोकांनी कॅमेऱ्यात कैद केलं असून याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतो.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक चित्ता पाणी पिण्यासाठी नदीकाठी येत आहे. तो पाणी पित असताना मगरीने त्याच्यावर हल्ला केला. चित्ता स्वतःला वाचवण्यासाठी तडफडतो मात्र मगर त्याला नदीत ओढून मारते. आजसापस असलेले बाकीचे चित्तेही घाबरतात आणि दूरुनच पाहतात. मगर चित्त्याला पाण्याच्या खोलात नेते आणि दोघेही गायब होतात.
advertisement
advertisement
@comitivaferramula नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक थरारक, धोकादायक, हल्ल्याचे व्हिडीओ पहायला मिळतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2024 7:32 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Animal Video : हळूच पाण्यातून आली मगर, चित्त्यावर जीवघेणा हल्ला करत केलं ठार; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद










