VIDEO : ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये उभा राहून करत होता स्टंट; एक चुक आणि... हृदयाचा ठोका चुकवणारी घटना
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एका व्यक्तीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो अतिशय धोकादायक स्टंट करत आहे. या व्हिडीओमध्ये स्टंट करत असताना व्यक्तीसोबत असा काही प्रकार घडतो की ते पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.
मुंबई : भारतात रेल्वे प्रवास हा केवळ वाहतुकीचं साधन नाही, तर अनेकांसाठी तो दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, काही लोकांसाठी ट्रेनचा प्रवास हा रोमांचक स्टंट करण्याचे साधन बनतो, ज्यामुळे त्यांचे आणि इतरांचे प्राण धोक्यात येतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये लोक आपल्या जीवाशी खेळ करताना दिसतात.
यातच एका व्यक्तीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो अतिशय धोकादायक स्टंट करत आहे. या व्हिडीओमध्ये स्टंट करत असताना व्यक्तीसोबत असा काही प्रकार घडतो की ते पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या ट्रेनच्या दोन डब्यांच्या मधल्या जागेत उभा राहून फक्त एका हाताने ट्रेन पकडून बाहेर लटकत आहे. दुसऱ्या हाताने तो हवेत इशारे करत ‘हर-हर महादेव’चा जयघोष करतो.तो हे सगळं करत असताना जराही घाबरलेला नाही किंवा त्याला त्याच्या जीवाची जराही परवा नाही हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्याचा हा प्रकार पाहून असे वाटते की तो स्वतःचा स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्याच्या उद्देशाने हे करत आहे.
advertisement
मात्र, काही सेकंदातच हा थ्रिलिंग क्षण भीषण अपघातात बदलतो. ट्रेनच्या जवळून जाणाऱ्या एका लोखंडी विजेच्या खांबाला त्याचा चेहरा जोरात आपटतो. टक्कर एवढी जबरदस्त असते की तो मागे सरकतो आणि त्याचे संतुलन बिघडते. सुदैवाने, त्यावेळी ट्रेनचा वेग कमी असल्याने त्याला गंभीर दुखापत होत नाही; पण ट्रेनचा वेग जास्त असता, तर हा प्रसंग जीवघेणा ठरला असता.
advertisement
Kaisi laparvahi Karte Hain Log pic.twitter.com/PnvmEw4NlN
— Prabha Rawat 🕉️🇮🇳 (@Rawat_1199) August 11, 2025
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेक नेटिझन्सनी या तरुणाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे. एका युजरने लिहिले, “बरं झालं डोक्यावर लागलं नाही, नाहीतर जीव गेला असता.” तर दुसऱ्याने म्हटले, “असे स्टंट कधीही करू नयेत.” हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर @Rawat_1199 यांनी शेअर केला आहे. ही बातमी लिहिताना त्याला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 3:51 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये उभा राहून करत होता स्टंट; एक चुक आणि... हृदयाचा ठोका चुकवणारी घटना