Desi Jugad : जुगाडची कमाल, व्यक्तीनं स्वतःच बनवला देसी JCB; Video पाहून म्हणाल 'वाह क्या दिमाग है'

Last Updated:

हा JCB एखाद्या प्रोफेशनल कंपनीने नाही, तर एका स्थानिक व्यक्तीने जनरेटर, छोटे चाकं आणि अन्य काही साहित्य वापरून स्वतः बनवली आहे.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : सध्या सोशल मीडियावर दररोज काहीना काही तरी भन्नाट व्हायरल होतंच. कधी इथे मनोरंजक व्हिडीओ समोर येतात तर कधी लोकांच्या चित्रविचित्र प्रकारांचे व्हिडीओ समोर येतात. सध्या असाच एक आगळा वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
सर्वसामान्यपणे तुम्ही JCB पाहिलं असेलच. अनेकांना तर JCB काम करताना पाहायला आवडतं. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मोठा JCB नव्हे, तर त्याच्यासारखी दिसणारी एक छोटीशी "जुगाड JCB" दिसते आहे.
हा JCB एखाद्या प्रोफेशनल कंपनीने नाही, तर एका स्थानिक व्यक्तीने जनरेटर, छोटे चाकं आणि अन्य काही साहित्य वापरून स्वतः बनवली आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्यावर बसून, अगदी खऱ्या JCBसारखं त्याचा वापर करताना दिसतोय. तो जुगाड JCB माती उचलतो आणि दुसऱ्या बाजूला टाकतो. या जुगाडू मशीन इतकं परफेक्ट काम होताना पाहून कोणीही थक्क होईल.
खरंतर JCB खूप महाग असल्याने सर्वसामान्यांना तो विकत घेणं परवडत नाही, शिवाय काही लहान मोठ्या कामासाठी JCB भाड्याने बोलवायचा म्हणजे त्याला ही खूप पैसे जातात. त्यामुळे तो सर्वांच्या खिशाला परवडत नाही. पण या व्यक्तीने आता जुगाडू JCB बनवला आहे. त्यामुळे त्यांचं काम अगदी सोप्पं झालं आणि ते ही कमी किंमतीत.
advertisement
हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर @HasnaZaruriHai या युजरने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "JCB बनवणाऱ्या या भावाला शोधा!" बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ शेअर देखील करत आहेत. तर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
एका युजरने लिहिलं, "म्हणूनच जुगाड सगळं मार्केट बिघडवतो." दुसरा म्हणतो, "हा कुठून आहे, लवकर शोधा, नंतर पेटंट करून टाकेल." तिसरा युजर लिहितो, "भारत म्हणजे जुगाडाची राजधानी आहे." चौथा तर थेट विचारतो, "ही कोणत्या IITची कमाल आहे?"
शेवटी एवढंच म्हणावं लागेल की भारतात टॅलेंटची आणि जुगाडाची कमतरता नाही. कमी साधनांतून मोठं काम करणं हे खरं कौशल्य असतं आणि त्यात भारतीयांचा हात कोणीच पकडू शकत नाही. हा व्हिडीओ त्याचं परफेक्ट उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Desi Jugad : जुगाडची कमाल, व्यक्तीनं स्वतःच बनवला देसी JCB; Video पाहून म्हणाल 'वाह क्या दिमाग है'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement