Desi Jugad : अशा गोष्टीपासून बनवला अंघोळीचा शॉवर, कुणी स्वप्नात देखील विचार केला नसेल, एकदा हा Video पाहा

Last Updated:

एक भन्नाट जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा जुगाड म्हणजे शॉवरची सोय, पण तीही अगदी हटके पद्धतीने

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : भारत हा असा देश आहे, जिथे जुगाड करण्यामध्ये लोक मास्टर मानले जातात. प्रत्येक गल्लीबोळात, प्रत्येक मोहल्ल्यात तुम्हाला एखादा भन्नाट जुगाड पाहायला मिळतोच. सोशल मीडियावरही दररोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही पाहून लोक प्रभावित होतात, तर काहींना पाहून हसू आवरलं जात नाही.
आता पुन्हा एकदा असाच एक भन्नाट जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा जुगाड म्हणजे शॉवरची सोय, पण तीही अगदी हटके पद्धतीने
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की एका व्यक्तीनं आपल्या बाथरुममधल्या नळाला एक पाईप जोडला आहे. तो पाईप वर नेऊन भिंतीवर एंगलच्या मदतीने फिक्स केला आहे. वरती पाईपचा टोक वळवून तिथे एक पांढरा बल्ब लटकवलेला दिसतो. पहिल्यांदा पाहताना कुणालाही प्रश्न पडेल की पाईपवर बल्ब लटकवण्याचा काय संबंध?
advertisement
मात्र, कॅमेरा जेव्हा बल्बवर झूम करतो, तेव्हा दिसतं की त्या बल्बवर अनेक छोटे-छोटे छिद्र आहेत. म्हणजेच, हा बल्ब आता एकदम शॉवरसारखा दिसतोय. जरी तो प्रत्यक्षात कसा काम करतो हे व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, तरी या जुगाडामागचा आयडिया पाहून लोक थक्क झाले आहेत.



 










View this post on Instagram























 

A post shared by casmsaurabh (@casm.saurabh)



advertisement
हा व्हिडिओ @casm.saurabh या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय – “Jugaad day by day”. काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि लोकांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला.
मराठी बातम्या/Viral/
Desi Jugad : अशा गोष्टीपासून बनवला अंघोळीचा शॉवर, कुणी स्वप्नात देखील विचार केला नसेल, एकदा हा Video पाहा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement