'एका दिवसात 12 बाटल्या... ' स्वत: सांगितला तो किस्सा; धर्मेंद्र यांना कोणती दारू सर्वात जास्त आवडायची?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
धर्मेंद्र यांचा अभिनय जितका दमदार होता, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. मग ते त्यांच्या पहिल्या बायकोबद्दल असोत किंवा त्यांच्या मुलांबद्दल. एवढच नाही तर त्यांच्या आवडीनिवडीही अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे सोमवारी (24 नोव्हेंबर) मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांचा मुलगा सनी देओल यांनी त्यांना मुखाग्नी दिली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
धर्मेंद्र यांचा अभिनय जितका दमदार होता, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. मग ते त्यांच्या पहिल्या बायकोबद्दल असोत किंवा त्यांच्या मुलांबद्दल. एवढच नाही तर त्यांच्या आवडीनिवडीही अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
यातील एक गोष्ट म्हणजे त्यांची दारूची आवड. त्यांनी स्वत: एका व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की त्यांना दारू पिण्याची आवड आहे आणि त्यांची ही सवय जगजाहीर आहे. त्यात त्यांनी त्यांच्या आवडीची दारु कोणती हे देखील सांगितलं आहे.
advertisement
धर्मेंद्र यांना दारूचे किती वेड होते, याचे एक उदाहरण त्यांनी स्वतःच सांगितले होते. 'शोले' (Sholay) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, त्यांनी एका दिवसात चक्क 12 बाटल्या दारू प्यायल्या होत्या. कॅमेऱ्यामागच्या अंधारात बसून ते दारू पीत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली होती. त्यांची ही सवय अनेकदा चर्चेचा विषय ठरली होती.
जाहिरातीचा 'टायटल टॅग'
धर्मेंद्र यांची दारूची आवड पाहून एका मोठ्या कंपनीने त्यांना आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले होते. 1993 मध्ये, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) या नामांकित लिकर कंपनीने त्यांच्या बॅगपायपर (Bagpiper) या इंडियन व्हिस्की ब्रँडसाठी धर्मेंद्र यांना साईन केले.
advertisement
या जाहिरातीतील त्यांची टॅगलाइन खूप गाजली:
"खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार... आप, मैं और बैगपायपर!" हा ब्रँड ॲम्बेसेडर रोल त्यांच्यासाठी खूप यशस्वी ठरला आणि कंपनीने मोठी कमाई केली.
धर्मेंद्र यांची आवडती व्हिस्की कोणती?
धर्मेंद्र भलेही बॅगपायपरचे ॲम्बेसेडर असले तरी, ती त्यांची आवडती व्हिस्की नव्हती. रिपोर्टनुसार, त्यांना स्कॉच व्हिस्की (Scotch Whisky) सर्वात जास्त आवडायची.
advertisement
ते अनेकदा ब्लॅक डॉग (Black Dog), टीचर्स (Teachers) किंवा जॉनी वॉकर ब्लॅक लेबल (Johnnie Walker Black Label) यांसारखे स्कॉच ब्रँड्स पसंत करत असत. यापैकीही, ब्लॅक लेबल व्हिस्की त्यांना इतकी आवडायची की ते तिला प्रेमाने 'ब्लॅकी' म्हणायचे.
धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 9:04 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'एका दिवसात 12 बाटल्या... ' स्वत: सांगितला तो किस्सा; धर्मेंद्र यांना कोणती दारू सर्वात जास्त आवडायची?


