Kishmish vs Manuka : मनुका आणि किशमिशला तुम्ही ही एकच समजता का? जाणून घ्या नेमका फरक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ड्रायफ्रुट्समधला एक असा पदार्थ आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही किंवा लोक त्याबद्दल कन्फ्यूज आहेत. हा पदार्थ आहे मनुका.
मुंबई : ड्राय फ्रुट्स हे आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे ते दररोज खाण्याचा सल्ला डायटिशन देतात. यामुळे शरीराला आवशक घटक मिळतात. पण हे ड्रायफ्रुट्स खूप महाग असतात. त्यामुळे लोक ते खाताना थोडं विचारपूर्व खातात.
पण याच ड्रायफ्रुट्समधला एक असा पदार्थ आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही किंवा लोक त्याबद्दल कन्फ्यूज आहेत. हा पदार्थ आहे मनुका.
आपल्या रोजच्या आहारात किंवा गोड पदार्थांमध्ये जसं की खीर, शेवया, हलवा, यामध्ये मनुक्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक तज्ज्ञ सांगतात की, मनुका फक्त कोरडा खाण्याऐवजी पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचा आरोग्यासाठी अधिक फायदा होतो. बाजारात मनूक्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी मिळते, यामध्ये रंगांनुसार हिरवी, पिवळी, काळी, नारिंगी) अनेक वेरायटी उपलब्ध असतात.
advertisement
पण अनेकांना याबद्दल मोठा गैरसमज आहे. लोकांना असं वाटतं की मनुका आणि किशमिश हा एकच पदार्थ आहे. फक्त त्याला हिंदीमध्ये किशमिश आणि मराठीत मनूका म्हणतात, पण असं नाही, हा अनेकांचा चुकीचा समज आहे.
किशमिश आणि मनुका यामध्ये दिसायला साम्य असलं तरी त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक आहेत. चला ते समजून घेऊ.
advertisement
किशमिश हा लहान आकाराच्या द्राक्षांना वाळवून तयार केला जातो. ती चविला गोडसर आणि किंचित आंबट लागते. यामध्ये फायबर्स आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे पचन सुधारतं आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
मनुका हे देखील वाळवलेलं द्राक्ष असलं तरी ते मोठ्या आणि पिकलेल्या काळसर द्राक्षांपासून बनवलं जातं. याचा आकार किशमिशपेक्षा मोठा आणि रंग गडद असतो. चव पूर्णपणे गोडसर आणि सौम्य असते. मनुका विशेषतः गॅस, अपचन आणि पोटाच्या तक्रारींवर उपयोगी मानलं जातं.
advertisement
किशमिश सामान्यतः एक पौष्टिक स्नॅक म्हणून खाल्ली जाते, तर मनुका अनेकदा आयुर्वेदिक औषधांसारखा वापरला जातो. म्हणून पुढच्यावेळी तुम्ही किशमिश किंवा मनुका खरेदी करताना, त्यांच्या उपयोग आणि गुणधर्म लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 14, 2025 7:31 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Kishmish vs Manuka : मनुका आणि किशमिशला तुम्ही ही एकच समजता का? जाणून घ्या नेमका फरक