जिल्हाधिकाऱ्यांनी कार थांबवली, ते 20 मिनिटं आणि बदललं मुलींचं आयुष्य; सिनेमासारखी वाटेल रिअल लाईफ स्टोरी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी एखाद्याच्या निर्णयामुळे घडणाऱ्या काही गोष्टी अशा काही बदलतात की त्यामुळे एखाद्याचं आयुष्य 360 डिग्री बदलू शकतं, जे पाहाताना एखाद्या चित्रपटाच्या कथेसारख्या वाटतात.
मुंबई : कधी कधी जीवनात अशी एकादी घटना घडते की ती नकळत एकाद्याचं आयुष्य बदलून टाकते. तर कधी एखाद्याच्या निर्णयामुळे घडणाऱ्या काही गोष्टी अशा काही बदलतात की त्यामुळे एखाद्याचं आयुष्य 360 डिग्री बदलू शकतं, जे पाहाताना एखाद्या चित्रपटाच्या कथेसारख्या वाटतात. अशीच एक खरी आणि मनाला भिडणारी गोष्ट अलीकडे समोर आली आहे, जिथे एका अधिकाऱ्याच्या संवेदनशीलतेने काही मुलींचं आयुष्यच बदलून टाकलं.
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात घडलेली ही एक अशीच खरीखुरी घटना आहे. जिल्हाधिकारी मधुसूदन हुलगी यांनी अचानक आपली गाडी थांबवल्यामुळे काही मुलींचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आता तुम्ही विचार कराल की असं नक्की काय घडलं असेल?
कार थांबवून त्यांनी रस्त्याकडेला मातीची भांडी बनवणाऱ्या लहान मुलींशी संवाद साधला, आणि पुढच्याच क्षणी त्यांनी त्या सगळ्यांसाठी शाळेचं दार उघडून दिलं.
advertisement
सोमवारी सकाळी डीएम मधुसूदन हुलगी रुग्णालयांच्या तपासणीसाठी बाहेर पडले होते. परत कलेक्टर कार्यालयाकडे जात असताना, त्यांनी रस्त्याच्या कडेला काही लहान मुलींना मातीची भांडी बनवताना पाहिलं. त्या साधारण ४–५ मुली होत्या, ज्या उन्हात काम करत होत्या.
हे दृश्य पाहताच डीएमनी तात्काळ गाडी थांबवली. कारमधून उतरून ते त्या मुलींकडे गेले आणि विचारलं, “शाळेत जाता का?” मुलींनी उत्तर दिलं “नाही.” कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शाळेत जाण्याची परवानगी दिलेली नाही.
advertisement
हे ऐकल्यावर डीएम मधुसूदन हुलगी यांनी त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की शिकल्याशिवाय कोणीही आयुष्यात पुढं जाऊ शकत नाही. मग ते स्वतः त्या मुलींबरोबर चालत त्यांच्या गावात गेले. मागून अन्य अधिकारीही सोबत गेले.
गावात पोहोचल्यावर डीएमनी प्रत्येक मुलीच्या घरात जाऊन त्यांच्या पालकांशी संवाद साधला. त्यांनी विचारलं, “मुलींना शाळेत का पाठवत नाही?” पालकांनी सांगितलं, “साहेब, या शिकून काय करणार? आम्हाला शाळेच्या फी, वह्या-पुस्तकांचे पैसे नाहीत.”
advertisement
यावर डीएमनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं, “तुम्ही शिकला नाहीत म्हणून आज या कुम्हारकामावर जगत आहात. पण तुमच्या मुलींना शिकू द्या, त्यांचं आयुष्य बदलू शकतं. सरकारकडून त्यांना मोफत शिक्षण, गणवेश, वह्या-पुस्तकं, तीन वेळचं गरम जेवण, बॅग, पेन, स्वेटर सगळं मिळेल. तुम्हाला एक पैसाही द्यावा लागणार नाही.”
एका मुलीने सांगितलं की तिचं शिक्षण मध्येच थांबलं आहे आणि दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाला नाही.
advertisement
त्यावर डीएम म्हणाले “तू शाळेचं नाव सांग, मी स्वतः तुझं जुन्या शाळेचं ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) काढून देतो आणि प्रवेश करवून घेतो.”
सुमारे 20 मिनिटं डीएम त्या गावात थांबले. त्यांनी सहा पेक्षा अधिक मुलींच्या पालकांशी संवाद साधला. शेवटी त्यांनी उपजिल्हाधिकारी सुखलाल प्रसाद वर्मा यांना निर्देश दिले “गावातील ज्या सर्व मुली शाळेबाहेर आहेत किंवा ड्रॉप आऊट झाल्या आहेत, त्यांची यादी तयार करा आणि सगळ्यांचा प्रवेश कस्तुरबा गांधी आवासीय बालिका विद्यालय मंझनपुर किंवा राजकीय आश्रम पद्धती बालिका विद्यालय भरसवां येथे करून द्या.”
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 7:21 PM IST
मराठी बातम्या/Viral/
जिल्हाधिकाऱ्यांनी कार थांबवली, ते 20 मिनिटं आणि बदललं मुलींचं आयुष्य; सिनेमासारखी वाटेल रिअल लाईफ स्टोरी