Do You Know : कीबोर्डवरील F आणि J बटणांवर अशी खून का असते? हे फक्त डिझाइन नाही, त्यामागे लपलंय खास कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक लोक विचार करत असतील की हे डिझाईनचा भाग आहे, पण असं नाही. त्यामागे एक अत्यंत उपयोगी कारण आहे.
मुंबई : आजच्या आधुनिक युगात कंप्युटर आणि लॅपटॉप हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. विद्यार्थी असो वा ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती प्रत्येकजण रोजच्या कामांसाठी कीबोर्डचा वापर करतोच. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, की कीबोर्डवरील F आणि J या बटणांवर छोटेसे उभार (raised dots) असतात? आणि त्यावर एक लहान रेषा देखील असते. ते का असतात?
अनेक लोक विचार करत असतील की हे डिझाईनचा भाग आहे, पण असं नाही. त्यामागे एक अत्यंत उपयोगी कारण आहे.
कीबोर्डवरील हे उभार टायपिंग अधिक सोपं आणि अचूक बनवण्यासाठी तयार केले गेले आहेत. कंप्यूटरवर टायपिंग करताना ज्या बटणांवरून हाताची स्थिती ठरते, त्याला ‘होम रो पोजिशन’ (Home Row Position) असं म्हणतात. ही होम रो लाईन म्हणजेच कीबोर्डवरील A, S, D, F, J, K, L आणि ; (सेमिकोलन) ही बटणं. त्यात F आणि J या बटणांवर छोटासा उभार देण्यात आलेला असतो, जेणेकरून टायपिस्ट आपल्या हातांची बरोबर जागा शोधू शकेल तेही स्क्रीनवरून नजर न हलवता.
advertisement
हे उभार म्हणजे टायपिंगसाठी ‘मार्गदर्शक बिंदू’. जेव्हा तुम्ही कीबोर्डकडे न पाहता टाइप करता, तेव्हा बोटांना या उभारांमुळे आपली स्थिती समजते. उजव्या हाताची तर्जनी J वर आणि डाव्या हाताची तर्जनी F वर ठेवली जाते. यामुळे उर्वरित बोटं आपोआप इतर योग्य बटणांवर पोहोचतात.
टायपिंग स्पीड आणि अचूकता वाढवण्यासाठी हा छोटा डिझाईन मोठं काम करतो. सतत कीबोर्डकडे पाहत टायप केल्याने गती कमी होते आणि चुका होण्याची शक्यता वाढते. पण F आणि J वरील उभारांमुळे हातांची स्थिती सहज लक्षात येते, त्यामुळे टायपिस्ट स्क्रीनवर लक्ष केंद्रित ठेवू शकतो.
advertisement
या डिझाईनचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींनाही टायपिंग सोपं होतं. हे उभार स्पर्शाने ओळखता येतात, त्यामुळे दृष्टी नसलेले लोक देखील योग्य बटणावर हात ठेवून सहज टायप करू शकतात.
आज आपण कितीही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरत असलो, तरी कीबोर्डच्या या लहानशा डिझाईनमुळेच आपलं काम जलद, अचूक आणि सोपं होतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कीबोर्ड वापराल, तेव्हा त्या F आणि J वरच्या छोट्याशा उभाराकडे नक्की लक्ष द्या कारण हाच छोटासा स्पर्श तुमच्या टायपिंगला प्रोफेशनल बनवतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 8:56 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Do You Know : कीबोर्डवरील F आणि J बटणांवर अशी खून का असते? हे फक्त डिझाइन नाही, त्यामागे लपलंय खास कारण


