Fack Check : ‘ओर्का’ व्हेलने महिला ट्रेनरला गिळलं; लाईव्ह शोमधील धक्कादायक प्रसंगाचं सत्य अखेर उघड, पाहा Video
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे ट्रेनर जणू आपल्या मुलांप्रमाणे त्या जीवांची काळजी घेतात. प्राणी देखील आपल्या ट्रेनचं ऐकताना आणि त्यांना जीव लावताना तुम्ही पाहिलं असेल, या संबंधीत अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. पण एक याच्या अगदी उलट घटना घडली.
मुंबई : सोशल मीडियाच्या दुनियेत असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात की ते हादरवून सोडतात. इथे एकादा व्हिडीओ किंवा क्लिप आली की ती वाऱ्यासारखे पसरते. काही व्हिडीओ तर मन हादरवून सोडणारे असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ एका ट्रेनसशी संबंधीत आहे. प्राण्यांना पाळणारे ट्रेनर्स हे ट्रेनिंग सेंटरमध्ये असतात. ते प्राण्यांची काळजी घेतात, त्यांना काय हवंय नको ते पाहातात. तसेच त्यांना प्रशिक्षण ही देतात. हे ट्रेनर जणू आपल्या मुलांप्रमाणे त्या जीवांची काळजी घेतात. प्राणी देखील आपल्या ट्रेनचं ऐकताना आणि त्यांना जीव लावताना तुम्ही पाहिलं असेल, या संबंधीत अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. पण एक याच्या अगदी उलट घटना घडली.
advertisement
अलीकडेच असा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये मरीन ट्रेनर जेसिका रॅडक्लिफ नावाची महिला ‘ओर्का’ नावाच्या विशाल डॉल्फिन माशाला ट्रेनिंग देताना दिसते. स्टेडियमसारख्या ठिकाणी जमलेली गर्दी हा शो एन्जॉय करत असते, पण अचानकच ओर्का माशा तिच्यावर हल्ला करते आणि तिला आपल्या दातांमध्ये पकडते. हा व्हिडीओ इतका धक्कादायक होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिल.
advertisement
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. पण काही दिवसांनी आता या व्हिडीओची सत्यता समोर आली आहे. तपासात समोर आले की हा संपूर्ण व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. व्हिडीओतील प्रेक्षकांची गर्दी, आवाज, आणि दृश्ये इतर एका वेगळ्या व्हिडीओमधून घेऊन त्यात AI द्वारे जेसिका आणि ओर्का माशाचा बनावट प्रसंग जोडण्यात आला होता.
advertisement
याव्यतिरिक्त, जेसिका रॅडक्लिफ नावाची कोणतीही मरीन ट्रेनर अस्तित्वात नाही, तसेच अशा प्रकारचा ओर्का माशाचा हल्ला झाल्याची कोणतीही नोंद आढळून आलेली नाही. त्यामुळे हा व्हिडीओ पूर्णपणे काल्पनिक असल्याचे स्पष्ट झालं आहे.
I have jessica radcliffe video orca, jessica radcliffe orca attack video, video jessica accident orque!!
6 minutes video 👇 https://t.co/4DBCKycyxT pic.twitter.com/PgXYavYSgp
— Burhan Khizer (@MeerKp20450) August 11, 2025
advertisement
AI तंत्रज्ञान जितके प्रगत आहे, तितकेच ते धोकादायकही ठरू शकते. अशा प्रकारचे AI व्हिडीओ लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवतात, अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण करतात. त्यामुळे जगभरात याविरोधात कडक कायदे बनवण्याची, तसेच अचूक ‘फॅक्ट-चेकिंग’ टूल्स विकसित करण्याची चळवळ सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Fack Check : ‘ओर्का’ व्हेलने महिला ट्रेनरला गिळलं; लाईव्ह शोमधील धक्कादायक प्रसंगाचं सत्य अखेर उघड, पाहा Video


