General knowledge : पृथ्वीजवळील 'या' ग्रहाला आहे शेपूट, इथे 88 दिवसांचा असतो एक वर्ष; सौरमालेतील अद्भुत रहस्य अनेकांना माहितच नाही

Last Updated:

अंतराळ विज्ञानामुळे आपण चंद्र, मंगळ आणि इतर ग्रहांबद्दल बरीच माहिती मिळवू शकलो. पण अजूनही अनेक गोष्टींची आपल्याला माहिती नाही.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती आपल्या सौरमालेचा एक भाग आहे. पण पृथ्वीच्या पलीकडेही एक विशाल, अनंत आणि गूढ असा अंतराळ आहे, जिथं अजूनही खूप काही शोधायचं बाकी आहे. अंतराळ विज्ञानामुळे आपण चंद्र, मंगळ आणि इतर ग्रहांबद्दल बरीच माहिती मिळवू शकलो. पण अजूनही अनेक गोष्टींची आपल्याला माहिती नाही. तुम्हाला जर सांगितलं की सौरमंडळात एक असा ग्रह आहे ज्याला शेपूट आहे? तर तुमचा विश्वास बसेल? हे ऐकायला थोडं विचित्र आहे पण खरं आहे.
तो ग्रह कोणता? आणि त्याला शेपूट का आहे? चला याबद्दल थोडं सविस्तर माहिती घेऊ.
हा शेपूट असलेला ग्रह आहे बुध. खरंतर या ग्रहाबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे आणि थोडी थोडकी माहिती असली तरी अनेकांना त्याबद्दल चुकीचा समज आहे.
बुध ग्रह हा आपल्या सौरमालेतील सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. इतका जवळ असूनही त्याच्याविषयी अनेक गोष्टी सामान्य लोकांना माहीत नाहीत. बहुतेक लोकांना असं वाटतं की सूर्याजवळ असल्यामुळे तो सर्वात गरम ग्रह असावा, पण ही अर्धवट माहिती आहे.
advertisement
खरंतर बुध ग्रहावर बर्फ आहे. याचं कारण म्हणजे बुध ग्रह हा पूर्णपणे सरळ आहे. त्यामध्ये पृथ्वीसारखा कोणताही झुकाव नाही. यामुळे त्याचे ध्रुव सूर्यकिरणांपासून कायम वाचून आहेत आणि तिथे असलेला बर्फ वितळत नाही.
बुधचं एक वर्ष म्हणजे सूर्याभोवतीची एक फेरी ही फक्त 88 दिवसांचीच असते. पण त्याचा एक दिवस (स्वतःभोवती फिरण्याचा वेळ) हा तब्बल 59 पृथ्वीवरील दिवसांचा असतो. म्हणजेच तिथल्या एका दिवसात आपल्याकडे जवळपास दोन महिने उलटतात.
advertisement
सूर्याजवळ असूनही बुध हा सर्वात गरम ग्रह नाही, यामागचं कारण म्हणजे बुधकडे वायुमंडल जवळपास नाहीच. त्यामुळे दिवसा गरम, रात्री थंड असा तापमानाचा प्रचंड फरक असतो.
बुधकडे एक आश्चर्यकारकपणे सक्रिय चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र सौर वाऱ्यांना धडकतं आणि चुंबकीय वादळं (magnetic tornadoes) निर्माण करतो. एवढंच नाही तर बुध ग्रहाच्या मागे एक शेपूट दिसून आली आहे. अगदी धूमकेतूप्रमाणे. याचं कारण म्हणजे त्याच्या वातावरणात असलेले सोडियमचे अणू जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर दीर्घकाळपर्यंत अंतराळात चमकत राहतात.
advertisement
बुधचं वायुमंडल अतिशय पातळ आहे आणि त्याला एक्सोस्फिअर म्हणतात. यात ऑक्सिजन, हायड्रोजन, हीलियम, सोडियम आणि पोटॅशियमचे अणू आढळतात. हे वातावरण असूनही त्याचं अस्तित्व सूर्याजवळही टिकतं, ही विज्ञानाला आजही आश्चर्यकारक गोष्ट वाटते.
बुध ग्रहावर असलेला बर्फ, त्याची धीम्या गतीने फिरणारी दिनचर्या, धूमकेतूसारखी शेपूट, आणि त्याचं अनोखं वायुमंडल हे सगळं त्याला एक अत्यंत गूढ आणि रोमांचक ग्रह बनवतं.
मराठी बातम्या/Viral/
General knowledge : पृथ्वीजवळील 'या' ग्रहाला आहे शेपूट, इथे 88 दिवसांचा असतो एक वर्ष; सौरमालेतील अद्भुत रहस्य अनेकांना माहितच नाही
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement