Video : याला फक्त खड्डा समजण्याची चूक करु नका, आत गेलात तर असं काही दिसेल की डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा व्हिडीओ एका पारंपरिक अंडरग्राउंड घरांची एक विलक्षण वस्तीचा आहे, जी आजही अस्तित्वात आहे, ती पाहून कोणालाही क्षणभर वाटेल की आपण एखाद्या काल्पनिक जगात आलो आहोत.
मुंबई : भारत–चीनसारख्या विशाल देशांमध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी आजही सामान्य लोकांच्या नजरेपासून दूर आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, गगनचुंबी इमारती आणि वेगवान जीवनशैलीच्या या काळातही काही लोक आपली अशी घरे बांधतात किंवा वापरतात जी त्यांच्या वंशजांपासून वापरली जात आहे. कधीकधी ही घरं किंवा ठिकाणं अशी असतात की ती पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही आणि आश्चर्य वाटेल. असंच काहीसं सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ एका पारंपरिक अंडरग्राउंड घरांची एक विलक्षण वस्तीचा आहे, जी आजही अस्तित्वात आहे, ती पाहून कोणालाही क्षणभर वाटेल की आपण एखाद्या काल्पनिक जगात आलो आहोत.
हा व्हि़ीओ चीनच्या हेनान प्रांतातील बेइयिंग नावाच्या गावातील आहे, इथे ही अद्भुत अंडरग्राउंड घरांची वस्ती दिसते. इथल्या घरांना याओडोंग असे म्हटले जाते. याओडोंग म्हणजे जमिनीच्या आत खणलेले खोल अंगण पिट कोर्टयार्ड्स. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, घराच्या जागी मोठा खड्डा आणि त्याच्या भोवती खोदलेली खोल खोली. अशी ही अनोखी रचना आहे. हे सर्व घर सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि जगभरातील लोक या “भूमिगत गावाने” अक्षरशः थक्क झाले आहेत.
advertisement
इतिहास सांगतो की हे अंडरग्राउंड आताचं नवीन नाही तर ही परंपरा तब्बल 4,000 ते 5,000 वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे. चीनच्या लोएस पठारातील मऊ पण आश्चर्यकारकरीत्या मजबूत मातीमध्ये साधारण 6 ते 7 मीटर खोल खोदून ही वसाहत उभारली जाते. जमिनीखाली असूनही ही घरे मजबूत, टिकाऊ आणि पूर्णपणे नैसर्गिक तंत्राने तयार केलेली असतात. त्यामुळे त्यांना “निसर्गाची कलाकृती” म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
advertisement
या घरांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे नेचरल AC-हीटर सिस्टिम. उन्हाळ्यात इथलं वातावरण “बर्फासारखं थंड”, तर हिवाळ्यात खूपच उबदार” असतं. बाहेरील तापमानात कितीही चढ-उतार झाले तरी जमिनीखालील तापमान स्थिर राहते. हीच गोष्ट या घरांना हजारो वर्ष टिकवून ठेवण्यामागील मोठं कारण आहे. धक्कादायक म्हणजे, हे घर भूकंपातही तुलनेने सुरक्षित मानले जातात.
advertisement
advertisement
बाहेरून पाहिलं तर ते फक्त एक मोठा खड्डा वाटतात. पण आतमध्ये गेल्यावर संपूर्ण चित्रच बदलतं. आधुनिक फ्लॅटमध्ये जसं किचन, बेडरूम, बसण्याची जागा, ओपन अंगण तसं सर्व काही इथेही मिळतं. घराच्या मध्यभागी असलेल्या ओपन कोर्टयार्डमधून सरळ सूर्यप्रकाश आत येतो, त्यामुळे आत अंधार, ओलसरपणा किंवा दमटपणा जाणवत नाही. आणि घरांचा डिझाइन इतका नीटनेटका की पाहणारा थक्क होईल.
advertisement
गेल्या काही दशकांत मॉडर्नायझेशनमुळे या याओडोंग घरांची संख्या कमी झाली आहे. तरीही बेइयिंग गावातील शेकडो घरं जुण्या परंपरेतून बाहेर काढून सुंदररीत्या रेनोव्हेट केली गेली आहेत. आज ही ठिकाणं एक मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन बनली आहेत. जगभरातील लोक या "पाताळासारख्या" गावाला भेट देऊन तिथली जीवनशैली जवळून अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत. हजारो वर्ष जुन्या या अंडरग्राउंड संस्कृतीला जगासमोर आणण्याचे काम सोशल मीडियानेच केले, आणि लोक आता प्रत्यक्ष पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 4:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : याला फक्त खड्डा समजण्याची चूक करु नका, आत गेलात तर असं काही दिसेल की डोळ्यांवर विश्वास बसणार नाही


