advertisement

आता सोन्याचांदीची पाणीपुरी, VIDEO पाहून सांगा कोण कोण खाणार?

Last Updated:

गोल्ड-सिल्व्हर पाणीपुरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यावर बर्‍याच प्रतिक्रिया उमटत आहेत.

News18
News18
नवी दिल्ली : पाणीपुरी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पाणीपुरी फुलकी, पुचका, गोलगप्पा अशा वेगवेगळया नावांनी ओळखली जाते.  पाणीपुरी बनवायच्या पद्धतीही वेगवेगळया असतात. म्हणजे कुठे वाटाण्याचा रगडा, कुठे मूग तर कुठे उकडलेला बटाटा टाकून पाणीपुरी दिली जाते. पण तुम्ही कधी सोन्याचांदीची पाणीपुरी खाल्ली आहे का?
बाजारात सोन्या-चांदीची पाणीपुरी आली आहे,  ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोन्याचा आणि चांदीचा मुलामा असलेली ही पाणीपुरी, ज्यात सुका मेवा आणि थंडाई टाकली आहे. नंतर ती सोन्याच्या थाळीत सर्व्ह केली आहे.
गुजरातमधील अहमदाबादच्या स्ट्रीट फूड विक्रेत्याने तयार केलेली ही  पाणीपुरीची नवीन आवृत्ती अलीकडेच एका फूड ब्लॉगरने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.
advertisement
कशी बनवली सोन्याचांदीची पाणीपुरी?
फूड ब्लॉगर्स खुशबू परमार आणि मनन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पाणीपुरी विक्रेते अतिशय अनोख्या स्टाईलमध्ये ती सर्व्ह करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पुरी चिरलेली बदाम, काजू आणि पिस्त्यांनी भरली जाते, त्यानंतर त्यात भरपूर मध टाकला जातो. नंतर ती सहा लहान ग्लासेसमध्ये थंडाईबरोबर सर्व्ह केली जाते, प्रत्येक पुरी काळजीपूर्वक सोने आणि चांदीच्या फॉइलने झाकलेली असते.
advertisement
सोन्याचांदीची पाणीपुरी पाहून लोक म्हणाले...
हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण याला अनोखी कल्पना म्हणत आहेत, तर काहीजण राग व्यक्त करत आहेत. एका यूजरनं लिहिलं आहे  की, पाणीपुरीला पाणीपुरीच राहू द्या, तिला महालांची राणी बनवू नका. दुसऱ्याने लिहिले, त्याला बप्पी लाहिरी पाणीपुरी म्हणतात. तिसऱ्या यूजरने लिहिले, मी हे फुकटही खाऊ शकत नाही.
advertisement
advertisement
तुम्हाला ही पाणीपुरी कशी वाटली ती खाण्याची तयारी तुमची आहे का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समधे नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
आता सोन्याचांदीची पाणीपुरी, VIDEO पाहून सांगा कोण कोण खाणार?
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement