लग्न करताच नवरदेव उद्ध्वस्त! आयुष्यभर विसरणार नाही लग्नाची पहिली रात्र, नवरीसह सासरच्यांनी नको तेच केलं

Last Updated:

Bride family looted Groom : लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की नवरदेव आयुष्यभर विसरणार नाही. नवरीच्या कुटुंबाने त्याच्यासोबत भलताच कांड केला होता.

News18
News18
पाटणा : लग्नाचं वय होतात कित्येक तरुण-तरुणी लग्नाची स्वप्नं पाहू लागतात. बिहारमधील असाच एक तरुण ज्याचं लग्न करायचं होतं. त्याच्या भावाच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याला एक मुलगी मिळाली. त्यांचं लग्न ठरवलं आणि ठरल्यानुसार लग्न झालंसुद्धा. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की नवरदेव आयुष्यभर विसरणार नाही. नवरीच्या कुटुंबाने त्याच्यासोबत भलताच कांड केला होता.
हिसारच्या जुगलान गावात राहणाऱ्या कुलदीपने सांगितलं की, त्याचं लग्न 8 वर्षांपूर्वी बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावात राहणाऱ्या मुलीशी झालं होतं. त्याचा संसार एकदम सुरळीत चालला आहे. बिहारच्या जाडिया इथं राहणाऱ्या पवन मंडलने त्याला त्याचा भाऊ हंसराजचं लग्नही बिहारमध्ये करून देणार असल्याचं सांगितलं. घरच्यांनी हे मान्य केलं.
advertisement
कुलदीप म्हणाला, 30 ऑक्टोबर 2024 रोजी पवन मंडळाने मुलीची आई आजारी असल्याचं सांगू तिच्या उपचारासाठी 7 हजार मागितले आणि 31 ऑक्टोबरला हंसराजचं लग्न करणार असल्याचं सांगितलं.
यानंतर कुलदीप भाऊ हंसराज आणि कुटुंबासह बिहारमधील त्रिवेणगंज इथं पोहोचला. जेव्हा त्याने मुलगी पाहिली तेव्हा त्याला ती आवडली. त्यांनी मुलीचे कपडे आणि दागिन्यांसाठी 91,600 रुपये दिले. हंसराजचं लग्न रात्री झाली. यानंतर मध्यरात्री मुलीच्या कुटुंबीयांनी वधू आणि वराला एका कारमध्ये बसवलं आणि तेसुद्धा बाईकवर बसून कारसोबत निघाले.
advertisement
निर्जनस्थळी पोहोचल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांना पिस्तुल दाखवून अडवलं. त्यानंतर त्यांच्याकडील 30 हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यांनी वधूलाही सोबत नेलं. आता कुलदीपने बिहारच्या जादिया पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
लग्न करताच नवरदेव उद्ध्वस्त! आयुष्यभर विसरणार नाही लग्नाची पहिली रात्र, नवरीसह सासरच्यांनी नको तेच केलं
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement